
वडगावमधील जीवघेण्या चौकात ‘भुयारी मार्ग’ हवेच! भाजपाची मागणी
वडगाव मावळ :
देहूरोड-लोणावळा सहा पदरी महामार्गाचे काम वेगात सुरू असताना, वडगाव शहरातील अत्यंत गर्दीच्या आणि अपघातप्रवण चौकांत भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलांचा समावेश तातडीने करावा, अशी ठाम मागणी वडगाव शहर भारतीय जनता पक्षाने केली आहे.
शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर!
वडगाव हे मावळ तालुक्याचे प्रमुख ठिकाण असून दररोज हजारो सामान्य नागरिक शासकीय कामासाठी येथे येत असतात. याच मार्गालगत असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सुमारे ३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मार्गावर दररोज जाण्या-येण्यासाठी शेकडो विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. या मार्गावर आतापर्यंत अनेक अपघात घडले असून निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.
२०१६ मध्येही झाली होती पाहणी!
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशानुसार १ सप्टेंबर २०१६ रोजी महामार्गावरील अपघातप्रवण स्थळांची पाहणी करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय अधिकारी जैस्वाल, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विश्वनाथ आवटे, आयआरबीचे अधिकारी, तसेच स्तुप कंपनीचे व्यवस्थापक कुलकर्णी आदींनी संयुक्त पाहणी केली होती.
भाजपाची ठोस चार मागण्या:
वडगाव शहरातून जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (सध्याचा क्र. ४८) वर खालील ठिकाणी भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुल उभारण्यात यावेत, अशी जोरदार मागणी भाजपाने केली आहे:
अक्षय पॅलेस हॉटेलजवळ, मातोश्री हॉस्पिटल परिसर , दिग्विजय कॉलनी (शिवराज हॉटेल, माळीनगर (श्रीमंत महादजी शिंदे उद्यानाच्या मागे).
या मागणीसाठी कार्यकारी अभियंता शैलजा पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वडगाव शहर भाजपा अध्यक्ष संभाजीराव म्हाळसकर, युवा मोर्चा अध्यक्ष आतिश ढोरे, तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे सचिव अनंता कुडे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर वाघमारे, माजी नगरसेवक रविंद्र काकडे, किरण म्हाळसकर, रविंद्र म्हाळसकर, युवा उद्योजक चंद्रशेखर म्हाळसकर, विकी म्हाळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
- न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळच्या शिष्यवृत्ती यशाने तालुक्यात मानाचा ठसा
- मावळ जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप रचनेवर राजकीय विश्लेषण
- तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना जाहीर
- देशी वृक्ष लागवड ही काळाची गरज : रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीचा पर्यावरणपूरक उपक्रम
- वाहतूक कोंडीमुळे त्रस्त टाकवे बुद्रुक ग्रामस्थांचे पोलिस निरीक्षकांकडे निवेदन

