श्री. छत्रपती शिवाजी विद्यामंदिरात दिंडी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

अवघे गरजे पंढरपूर
चालला नामाचा गजर

वडगाव मावळ : आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यांसमोर येते ती पंढरीची वारी. अशीच वारी आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज, कान्हे या ठिकाणी बाल वारकऱ्यांच्या समवेत आयोजित करण्यात आली. पालखी सोहळ्याच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य श्री शहाजी लाखे आणि सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई च्या मूर्तीची व पालखीची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर पालखीने शाळेच्या परिसरात प्रस्थान ठेवले. संपूर्ण परिसर विठू नामाच्या गजराने भक्तिमय झाला होता. टाळ मृदुंगाच्या साथीने विद्यार्थ्यांनी अनेक अभंग रचना सादर केल्या.कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत आले होते. गळ्यात टाळ, मुखाने हरीनामाचा गजर करत अभंग या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी सादर केले. या बालदिंडीला वरुणराजाने हजेरी लावून दाद दिली. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांना केळी व लाडूचा प्रसाद देण्यात आला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नववी ब च्या विद्यार्थ्यांनी अतिशय नेटके पणे केले होते. याप्रसंगी श्री. रियाज तांबोळी, श्री. सोमनाथ साळुंके, सौ. वर्षा गुंड, कु. ज्योती धनवट, सौ. श्रद्धा तुपे, सौ. कविता येवले, सौ. सीमा ओव्हाळ,सौ. ज्योती सातकर, सौ. दीपिका सावळे, श्री. किरण गवारे,श्री. लक्ष्मण सातकर,श्री. बाळासाहेब भालेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सविता चव्हाण यांनी केले तर ज्येष्ठ अध्यापक श्री. संतोष हुलावळे यांनी आभार मानले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!