

तळेगाव जनरल हॉस्पिटल तर्फे कै. कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली
तळेगाव स्टेशन : माजी आमदार कै. कृष्णराव भेगडे यांना तळेगाव जनरल- हॉस्पिटल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे ,चेअरमन शैलेश शहा,नर्सिंग स्कूल चे पालक डॉ.शाळीग्राम भंडारी संस्थेचे संचालक सुखेंदू कुलकर्णी ,डॉ.किरण देशमुख, स्कूलच्या प्राचार्य मोनालिसा पारगे यांच्या सह सर्व शिक्षक वृंद आणि नर्सिंग स्कूलच्या सर्व विद्यार्थिनी या अत्यंत रुदय प्रसंगी उपस्थित होते.
चेअरमन शैलेश शहा यांनी आपल्या मनोगतात कृष्णरावांचा मायमर मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग स्कूलच्या उभारणीत आणि त्याबरोबर इतर शैक्षणिक विभागातील निर्मितीत सिंहाचा वाटा होता म्हणूनच त्यांना शिक्षण महर्षी संबोधित केले जाते असे सांगितले.
डॉ.शाळीग्राम भंडारी म्हणाले,” जीवा सवे जन्मे मृत्यू- जोड जन्म जात ! जे जे दिसे ते ते- विश्व नाशवंत- असं असलं तरी आपल्या हाती आलेलं आयुष्य- आपण कसं जगावं असं ज्यांच्याकडून शिकावं अशा आदरणीय कृष्णरावजी भेगडे आहे.या प्रसंगी- भारतीय संस्कृतीने स्वीकारलेल्या मंत्रोच्चाराने- सामूहिक श्रद्धांजली वाहून- या सांत्वन सभेची सांगता झाली.

- आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड – एसआयटी स्थापन : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत घोषणा
- ‘ एक पेड मॉ के नाम ‘ मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण
- तळेगाव जनरल हॉस्पिटल तर्फे कै. कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली
- कै.कृष्णराव भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शनिवारी तळेगावात शोकसभा
- ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली स्व. कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट

