
तळेगाव दाभाडे: पुणे जिल्ह्याचे नेते,मावळचे माजी आमदार ,शिक्षणमहर्षी कृष्णराव धोंडीबा भेगडे पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या स्मृती मावळकरांच्या मनात कायमच घर करून राहणा-या आहे.त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शनिवारी तळेगावात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मावळातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक बदलाचे साक्षीदार असलेल्या कै. कृष्णराव भेगडे यांच्या अनेक आठवणीनी मावळकरांच्या मनात आहे. त्या व्यक्त करण्यासाठी ही शोकसभा आहे. भेगडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली मावळचे नाव राज्याच्या नकाशावर कोरले गेले.
याच अनुषंगाने भेगडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘ मावळकरांच्या वतीने शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.वाजता शोकसभेचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या दालनात ही सभा असणार आहे.या सभेला उपस्थित राहून कै. भेगडे साहेबांच्या स्मृती ला उजाळा देऊ या असे आवाहन समस्त मावळकर नागरिक बंधू भगिनींच्या वतीने करण्यात आले आहे.
- कै.कृष्णराव भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शनिवारी तळेगावात शोकसभा
- ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली स्व. कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट
- यश दिशा २०२५ ” मार्गदर्शन परिसंवादास नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये उस्फुर्त प्रतिसाद
- इनर व्हील पिंपरी क्लबच्या अध्यक्ष पदी सविता इंगळे
- इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आमदार शेळके यांची मागणी

