यश दिशा २०२५ ” मार्गदर्शन परिसंवादास नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये उस्फुर्त प्रतिसाद


तळेगाव दाभाडे :नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने “यश दिशा २०२५” बारावी नंतरच्या शैक्षणिक वाटा हा शैक्षणिक मार्गदर्शन परिसंवाद मोठ्या उत्साहातनुकताच  नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पार पडला.


संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री संजय  (बाळा) भेगडे,  खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश मस्के यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


महाराष्ट्रातील प्रख्यात व्याख्याते व करिअर मार्गदर्शक डॉ. केतन देसले, डॉ. शंकरराव उगले, डॉ. शेखर राहणे व नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सीईओ डॉ. रामचंद्र जाहीरदार यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व करिअर विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. बारावीनंतरच्या विविध शैक्षणिक क्षेत्राची प्रवेश प्रक्रिया विषयी सविस्तर माहिती या कार्यक्रमातून देण्यात आली.


विद्यार्थी व पालकांच्या मनात असणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे व शंकेचे निराकरण परिसंवादाच्या माध्यमातून करण्यात आले.या कार्यक्रमाचा लाभ मावळ पंचक्रोशीतील जवळपास २५० हुन अधिक विद्यार्थी व पालकांनी घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन सपली यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणाला असणाऱ्या पर्यायी पदवी शिक्षण जसे बी.व्होक, बी.एस.सी.सायबर सिक्युरिटी, बी.सी.ए, एम.सी.ए, एम. बी.ए, विधी महाविद्यालय  यांचे महत्व अधोरेखित केले.


कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनं कार्यक्रम प्रमुख  प्रा. अभिजीत ऐवळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!