


वडगाव मावळ: आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायत हद्दीत नव्याने विकसित केलेल्या सर्व काँक्रिटीकरणच्या रस्त्यावर माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष पाठपुराव्याने वडगाव नगरपंचायत फंडातून गतिरोधक बसवण्याच्या कामास सुरुवात झाली.
ज्या परिसरातील रस्त्यावर धोकेदायक वळणे, चौक, स्कूल, मंदिरे, शासकीय कार्यालये यांसह वडगाव शहरातील सर्वच रस्त्यांवरील वर्दळीच्या ठिकाणी येत्या काही दिवसातच गतिरोधके बसविण्यात येणार आहे.
वडगाव नगरपंचायत हद्दीतील अनेक नागरिक खूप दिवसांपासून वेगवेगळ्या भागात गतिरोधक बसविण्याची मागणी करत होते. शहरातील मुख्य रस्त्यांवरून महिला भगिनींसह जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, कामगार ये जा करत असतात. तर दुसरीकडे याच परिसरात व्यापारी बांधवांची दुकाने असल्याने खरेदीसाठी नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर लगबग असते.
यावेळी अनेक दुचाकीस्वारांच्या सुसाट वेगामुळे वेगवेगळ्या वर्दळीच्या ठिकाणी अपघात होऊन जिवीतीला धोका होण्याची दाट शक्यताही असल्याने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वडगाव नगरपंचायत हद्दीतील वेगवेगळ्या परिसरातील अनेक नागरिक खूप दिवसांपासून मा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्याकडे गतिरोधक बसविण्याची मागणी करत होते. तसेच मागील काळात सर्व प्रसिद्धी माध्यमांनी हा प्रश्नही उपस्थित केला होता हि बाब लक्षात घेऊन आज अखेरीस नगरपंचायत फंडातून गतिरोधक बसविण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी दिली.
याव्यतिरिक्त मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही शहरातील अनेक परिसरात ठिकठिकाणी स्पीड बेकर बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. तरी वडगाव कातवीमधील नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी केली आहे. आजपासून अनेक भागांत स्पिड ब्रेकर चे काम मार्गी लागल्यामुळे त्यांना पाहून अनेकांनी आनंद देखील व्यक्त केला तसेच वाटसरू नागरिकही समाधानी झाले आहेत.
- नगरपंचायत फंडातून वडगावात गतिरोधक
- हजारो जनसमुदायांच्या उपस्थित साश्रुनयंनी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना निरोप
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या सन्मानार्थ तळेगावातील आस्थापना बंद
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन
- मावळ शिवसेनेचे कृषी अधिका-यांना पीकविमा बाबत निवेदन


