हजारो जनसमुदायांच्या उपस्थित साश्रुनयंनी  माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना निरोप


सामाजिक संस्थांचे आधारवड असलेले माजी आमदार कृष्णराव भेगडे पंचत्वात विलीन

तळेगाव दाभाडे : हजारो जनसमुदायांच्या उपस्थित साश्रुनयंनी मावळचे माजी आमदार व मावळभूषण कृष्णराव भेगडे यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.अनेक सामाजिक संस्थांचे आधारवड असलेले माजी आमदार कृष्णराव भेगडे पंचत्वात विलीन झाले.माजी आमदार भेगडे यांच्या आठवणींना सर्वांनी उजाळा दिला.


तळेगावातील बनेश्वर स्मशानाभूमीत  त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले.भेगडे यांचे पुतणे आनंद भेगडे यांनी अग्नीदाग दिला. मावळ तालुक्यातील आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळासह लोणावळा, कामशेत, वडगाव, देहू , देहूरोड शहरासह पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. भेगडे परिवारातील आप्तेष्टांना अश्रू रोखता आले नाही.


माजी नगराध्यक्ष रविंद्र दाभाडे म्हणाले, ” प्रतिकूल परिस्थितवर मात करीत भेगडे साहेबांनी राजकीय व सामाजिक कारकीर्द समृद्ध केली.संघाचे स्वयंसेवक तदनंतर पूर्ण वेळ कार्यकर्ता असे त्यांनी काम केले.विधानसभा निवडणुकीतील पराभव त्यांनी पचावला. ते प्रथम जनसंघाचे आमदार झाले.त्यांनी शैक्षणिक व सामाजिक संस्था वाढवल्या.अनेकांना मदतीचा हात दिला. त्यांच्या जाण्याने आधारवड हरपला.


संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे म्हणाले, ” भेगडे साहेबांनी सामाजिक जीवनात शैक्षणिक संस्था विस्तार केला. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. ते संस्थापक उपाध्यक्ष होते कारखान्याच्या जडणघडणीत मोठे योगदान होते.


राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  प्रदीप गारटकर म्हणाले, ” जिल्ह्यातील राजकारणात भेगडे यांनी  दैदिप्यमान असे  योगदान दिले. संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी कार्याचा ठसा उमटवला. शैक्षणिक क्षेत्रात मोठे व भरीव काम केले.त्यांनी  सामजिक चळवळ उभी केली. त्यामुळे ते जनसंघाचे आमदार झाले आणि नंतर कॉग्रेस आमदार झाले.असे नेतृत्व घडण्यासाठी चळवळ उभी करावी लागते.विचार बदला तरी समाज बरोबर राहतो याचे उदाहरण म्हणजे भेगडे साहेब आहे.


आमदार सुनिल शेळके म्हणाले , ” भेगडे साहेब जिल्हाचे नेते आणि मावळचे भूषण होते.विधानसभा आणि विधान परिषदेतील त्यांचे काम अनुकरणीय आहे.साहेबांनी जनतेचा प्रश्न मांडण्याचे मार्गदर्शन केले. आदिवासी बांधवांसाठी वडेश्वर ला शासकीय आश्रमशाळा आणि लोणावळ्यतील आयटीआय त्यांनी  उभारले.


माजी विलास लांडे म्हणाले , ” भेगडे साहेबांना राज्याचे नेते म्हणणे चुकीचे ठरू नये. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यादीत त्यांचे नाव अग्रगण्य आहे.त्यांनी पवार साहेबांसाठी राजीनामा दिला. मावळाला एकसंध घेऊन गेले तोच विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी राजेश म्हस्के आणि राजश्री म्हस्के यांच्या वर आहे.

माजी आमदार राम कांडगे म्हणाले, ” सरळ मार्गाने जाणारा देव माणूस काळाच्या पडद्याआड गेला.त्यांच्या राजकीय जीवनातील अनेक घटकांचा मीसाक्षीदार आहे. पुरोगामी लोकशाही दलाच्या  शिल्पकार यादीत भेगडे साहेब होते.ते राजकारणतील माझे गुरू आहे. सदापूर सारख्या छोटया गावाचा  प्रश्न त्यांनी सभागृहात मांडला. कृष्णा नसला तर मी डोळयांनी आंधळा असतो असे नानासाहेब नवले नेहमी म्हणायचे.

माजी आमदार जगन्नाथ शेवाळे म्हणाले, ” पन्नास वर्षाचा आमचा स्नेह होता.समाजाला गुरूस्थानी असलेले व्यक्ती म्हणून त्यांच्या कडे पाहिले पाहिजे.राजकारणातील  संस्कृती त्यांनी जपली.मोठा माणूस गेल्याने समाजची हानी होते. सुशील सैंदाणे यांनी सुत्रसंचालन केले. आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!