

‘
वडगाव मावळ :दुर्गम भागांतील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळावे, यासाठी ‘रयत विद्यार्थी विचार मंच’ दरवर्षी कृतीशील मदतीसह पुढे सरसावते. यंदा पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. वैशाली विठ्ठल खेडकर यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यातील कचरेवाडी व करंजगाव पठार येथील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आले.
डॉ. वैशाली खेडकर यांचे बंधू चैतन्य सखाहारी खेडकर यांचे मागील वर्षी केवळ २४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त, त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदत केली आहे. या उपक्रमांतर्गत दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या,पेन्सिल, कंपास, शालेय बॅग्ज, सतरंज्या व खाऊ वाटप करण्यात आले.
करंजगाव पठार येथील मुख्याध्यापक मल्लिकार्जुन कांबळे हे रोज दिघी येथून येऊन शाळेत शिकवतात, तर कचरेवाडी येथील शिक्षिका सौ. शिल्पा बडगुजर तळेगावहून रोज विद्यार्थ्यांसाठी डोंगररांगा ओलांडून येतात. या शाळांकडून रयत विद्यार्थी मंचकडे शैक्षणिक साहित्याच्या गरजेची विनंती आली होती.
प्रा. डॉ. वैशाली खेडकर व डॉ. महेश दवंगे यांनी या विनंतीला प्रतिसाद देत दोन्ही शाळांना भेट दिली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सतरंज्या व अल्पोपाहार दिला.हे सुपूर्त करताना त्यांनी त्यांच्या अडचणी व शैक्षणिक गरजांचा आढावा घेऊन भविष्यातील संधीं बद्दल मार्गदर्शन ही केले.
या उपक्रमामध्ये रयत विद्यार्थी विचार मंचचे प्रा. विक्रांत शेळके यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी दोन्ही शाळांशी संपर्क साधून त्यांची आवश्यक माहिती डॉ. वैशाली खेडकर यांच्यापर्यंत पोहोचवली व यामुळे गरजांप्रमाणे योग्य साहित्याची पूर्तता करण्यात आली.
डॉ. वैशाली खेडकर यांनी बंधू चैतन्य सखाहरी खेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेतलेला हा उपक्रम केवळ मदत नाही, तर समाजापुढे एक नवा आदर्श उभा करणारा आहे. अशा प्रकारे शैक्षणिक मदत म्हणजे गरजूंना आत्मसन्मानासह शिक्षणाची संधी देणारे कार्य आहे.
रयत विद्यार्थी विचार मंच’ ही संस्था गेली अनेक वर्षे राज्यभरातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आहे. यावर्षी डॉ. वैशाली खेडकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम नव्या उंचीवर पोहोचला. संस्थेच्या वतीने अशा सामाजिक कार्यात योगदान देण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन
- मावळ शिवसेनेचे कृषी अधिका-यांना पीकविमा बाबत निवेदन
- बुद्धाला स्वीकारण्यासाठी पाली भाषेकडे वळले पाहिजे : डॉ. श्रीपाल सबनीस
- फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे यांचा दशवार्षिक स्नेह मेळावा संपन्न
- मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना, अध्यक्ष पदी सुदेश गिरमे अध्यक्ष,कार्याध्यक्ष पदी विशाल विकारी, सचिव पदी रामदास वाडेकर


