नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्रशासक मंडळाची पहिली बैठक उत्साहात


तळेगाव दाभाडे :नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी  या संस्थेमध्ये स्वायत्ततेअंतर्गत पहिली प्रशासक मंडळाची बैठक  उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली.


या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार व कार्यकारी समितीचे चेअरमन  राजेश म्हस्के होते. बैठकीस संस्थेचे व्यवस्थापन प्रतिनिधी डॉ. गिरीश देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्राचार्य व सदस्य सचिव डॉ. एस. एन. सपली, उद्योग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, सदस्य  सचिन इटकर, सदस्य डॉ. डी. व्ही. जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी डॉ. वैशाली पाटील, संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. विलास देवतारे,  शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नितीन धवस, निबंधक  विजय शिर्के, लेखाधिकारी शुभदा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


बैठकीमध्ये संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासकीय दृष्टिकोनातून पुढील महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२५-३० साठीचे गुणवत्ता धोरण व दीर्घकालीन रणनीती योजना, शैक्षणिक परिषद व अभ्यास मंडळ यांची रचना व नियुक्त्या, अभ्यासक्रम नविनीकरण व परिणामाधारित शिक्षण पद्धती, मूल्यांकन व अभिप्राय धोरण, ‘अभ्यासमुक्त’ उपक्रम, स्मार्ट क्लासरूम व प्रयोगशाळांसाठी आवश्यक वार्षिक अर्थसंकल्प, उद्योग-संलग्नता कार्यक्रम, संशोधन व नवप्रवर्तन, स्टार्टअपला चालना देणाऱ्या योजनांवर विचारमंथन झाले.या ऐतिहासिक बैठकीचे नियोजन व सूत्रसंचालन डॉ. सागर शिंदे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!