
कामाप्रती सेवाभाव, निष्ठा आणि माणुसकी ही त्रिसूत्रीमुळेच सर्वांच्या मनात घर निर्माण करुन व्यक्तिमत्त्व घडवलं — गणेश खांडगे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळा दोपाडी येथील कामगार नेते चंद्रकांत चव्हाण यांचा सेवानिवृत्ती व वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ दापोडी कार्यशाळा येथील एसटी कामगार संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते, माझी एस टी मत समूहाचे सक्रिय सदस्य आणि दापोडी वर्कशॉपचे अत्यंत आदराचे व्यक्तिमत्त्व श्री. चंद्रकांत चव्हाण यांनी यात्रिक या पदावर आपल्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ, कष्टमय व प्रेरणादायी सेवेला निरोप दिला.
तळेगाव दाभाडे येथील अपूर्वा लॉन्स येथे सेवा पूर्ती समारंभ व अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला
दिनांक १७ जून २०२५ हा दिवस केवळ एक वाढदिवस किंवा सेवानिवृत्तीचा दिवस नव्हता, तर ती होती एक अख्खी मैत्री आणि कर्तव्यनिष्ठेची महोत्सवमूर्ती होती!
एसटी कामगार संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते, माझी एस टी मत समूहाचे सक्रिय सदस्य आणि दापोडी वर्कशॉपचे अत्यंत आदराचे व्यक्तिमत्त्व श्री. चंद्रकांत चव्हाण यात्रिक यांनी आपल्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ, कष्टमय व प्रेरणादायी सेवेला निरोप दिला…
या कार्यकालात माणसं जोडणं ही कला असते. पण माणसांच्या हृदयात घर करणं ही श्री.चव्हाण साहेबांची ओळख झाली होती.
या सत्कार समारंभाला केवळ दापोडी नाही, तर महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील कानाकोपऱ्यातून त्यांचे नातेवाईक मित्र, सहकारी, अधिकारी वर्ग आणि शुभचिंतक आवर्जून उपस्थित राहिले.
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, कृष्णाजी कारके,महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, केंद्रिय अध्यक्ष संदिप शिंदे, विजय दिवटे, एस टी अधिकारी संजय कांबळे माजी शिक्षण मंडळ सभापती सुहास गरुड,माजी नगरसेवक लक्ष्मण माने, विजय गरुड, संदिप शेळके, अशोक काळोखे,पवना सहकारी बॅंकेचे माजी संचालक भाऊसाहेब डोळस, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पांडुरंग पोटे,संजय वंजारे, शहाजी लाखे,वासंती काळोखे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कैलास पारधी, रेवप्पा शितोळे यांच्यासह अनेकांनी हजेरी लावून त्यांना शब्दसुमनांद्वारे गौरवले.
चव्हाणसाहेबांचा सेवाभाव, निष्ठा आणि माणुसकी यांना त्रिवार सलाम करत त्यांचा गौरव करण्यात आला.
सोहळा म्हणजे केवळ फुलांचा वर्षाव नव्हता, तो होता श्रद्धेचा, प्रेमाचा आणि आठवणींचा सागर.
त्यांच्या पुढील जीवनप्रवासाला हार्दिक शुभेच्छा देत त्यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता चव्हाण यांनी केले सुत्रसंचलन भारत काळे व प्रभा काळे तर आभार सोमनाथ साळुंखे यांनी मानले
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन
- मावळ शिवसेनेचे कृषी अधिका-यांना पीकविमा बाबत निवेदन
- बुद्धाला स्वीकारण्यासाठी पाली भाषेकडे वळले पाहिजे : डॉ. श्रीपाल सबनीस
- फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे यांचा दशवार्षिक स्नेह मेळावा संपन्न
- मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना, अध्यक्ष पदी सुदेश गिरमे अध्यक्ष,कार्याध्यक्ष पदी विशाल विकारी, सचिव पदी रामदास वाडेकर

