नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळातर्फे ‘ एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम

तळेगाव दाभाडे: नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या ऐतिहासिक संस्थेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ या वर्षीपासून एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम सुरु केला आहे. संस्था संचलित सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व सी. बी. एस. ई. इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांमध्ये एक विद्यार्थी एक झाड हा प्रकल्प राबवण्यात आला.

गतवर्षी प्रमाणे याही वर्षी शाळा सुरु झालेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना देशी वृक्षाची रोप वाटप करण्यात आल्याची व त्याचे संगोपन करण्याबाबतच्या सुचण्या दिल्याची माहिती संस्थेचे सचिव व प्रकल्प प्रमुख संतोष खांडगे तसेच प्रकल्प सहप्रमुख सोनबा गोपाळे यांनी दिली.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ ही ऐतिहासिक संस्था असून संस्थेचे आधारस्तंभ शिक्षणमहर्षी, मावळभूषण मा. श्री. कृष्णराव भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सी. बी. एस. ई. इंग्लिश मिडीयम स्कूल व अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच बी. व्होक कोर्सेस अश्या २१ विभागामध्ये यशस्वीपणे शैक्षणिक कार्य चालू आहे. या सर्व विभागामधून जवळपास ११००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना वृक्षरोपन व संगोपन याची आवड निर्माण व्हावी म्हणून शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ पासून एक विद्यार्थी एक झाड हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. संजय तथा बाळा भेगडे (राज्यमंत्री), उपाध्यक्ष श्री. गणेश खांडगे, सचिव श्री. संतोष खांडगे, खजिनदार श्री. राजेश म्हस्के, सहसचिव श्री. नंदकुमार शेलार यांच्यासह शाळांचे शालेय समित्यांचे अध्यक्ष श्री. संतोष खांडगे,  श्री. गणेश खांडगे,  श्री. नंदकुमार शेलार, श्री. दामोदर शिंदे, श्री. महेशभाई शहा, श्री. यादवेंद्र खळदे, श्री. सोनबा गोपाळे, श्री. विनायक अभ्यंकर ही सर्व मंडळी हा उपक्रम राबविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करीत आहेत.

वाढते प्रदूषण, ऑक्सिजनचे घटते प्रमाण लक्षात घेता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संस्थेचे सचिव व प्रकल्प प्रमुख श्री. संतोष खांडगे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी संस्थेकडून देशी वृक्षाची रोप उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!