

चौदा वर्षापासून राबवले जातात सामाजिक उपक्रम
टाकवे बुद्रुक : येशील उद्योजक कै. दत्तात्रेय गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गायकवाड परिवाराच्या वतीने आषाढी वारीला पायी जाणा-या मावळ तालुक्यातील सर्व दिंडी प्रमुखांचा सत्कार केला. वारीत जाणा-या वारक-यांना अन्नदानासाठी रोख रक्कम देऊन अन्नदानाचे पुण्य मिळवले. मागील चौदा वर्षापासून कै. दत्तात्रेय गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
यंदा दिंडी प्रमुखांचा सत्कार करीत अन्नदानासाठी रोख रक्कम अदा केली. ह. भ. प. विश्वनाथ महाराज केंद्रे यांचे प्रवचन झाले.त्यांनी मानवी जीवनातील विविध पैलू विस्ताराने मांडले. संत कृपेने पारमार्थिक सेवा घडते असा विश्वास दिला. मावळ तालुक्यातील वारकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी मावळ तालुका दिंडी समाज, पवन मावळ दिंडी समाज, घोरावडेश्वर दिंडी समाज, महादू काळोखे दिंडी समाज, कोंडेश्वर दिंडी समाज, तळेगाव माळवाडी दिंडी, संत सेना दिंडी समाज, संत नामदेव दिंडी, भामचंद्र दिंडी समाज, पोटोबा महाराज दिंडी समाज, संत जगनाडे दिंडी समाज, संत जगनाडे पालखी सोहळा, भंडारा डोंगर दिंडी समाज, संत गवरशेठ दिंडी समाज, चक्श्वर दिंडी समाज, गोरोबा काका दिंडी समाज, भैरवनाथ दिंडी सोहळा, बोधलेबुवा दिंडी समाज, वैकुंठगमन दिंडी समाज, इंचगिरी रसाळ सांप्रदाय दिंडी , संत तुकाराम सामाजिक टॢस्ट या दिंडी सोहळयांचा सत्कार करण्यात आला.
कै. सखाराम गायकवाड यांचा मावळ तालुका दिंडी समाजाच्या स्थापनेत पुढाकार होता.त्याचे अनुकरण करीत गायकवाड परिवार वारकरी संप्रदायाचा वसा जपत आहे. आंदर मावळातील यशस्वी उद्योजक अशी कै. दत्तात्रेय गायकवाड यांची ओळख होती. चौदा वर्षापूर्वी त्यांचे जाणे झाले. मागील तेरा वर्षापासून दत्तात्रेय गायकवाड यांचा पुण्यस्मरण दिन विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो.
यावर्षी मावळातील दिंडी चालकांचा सत्कार करून अन्नदानासाठी रोख रक्कम देण्याचा संकल्प मावळ तालुका दिंडी समाजाचे माजी अध्यक्ष तुकाराम गायकवाड व माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड यांनी केला. आणि तो पूर्ण केला. कै. दत्तात्रेय गायकवाड प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाराही महिने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड म्हणाले, ” आम्हा शेतकरी कुटुंबाला उद्योग व्यवसायात स्थिरस्थावर करण्यात कै. दत्ताशेठ यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या इतिहासाने बंधूप्रेम शिकवले.तेच प्रेम जपण्याचा प्रयत्न करीत आहे.बंधूंच्या अनेक आठवणी चलचित्रपटा सारख्या डोळ्यासमोरून तरळून जातात. त्यांच्या कतृत्वाच्या उजाळा देण्यासाठी दरवर्षी सामाजिक उपक्रम केले जातात
- शिक्षक संघटनांनी बळकट व्हावे: माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे
- नगरपंचायत फंडातून वडगावात गतिरोधक
- हजारो जनसमुदायांच्या उपस्थित साश्रुनयंनी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना निरोप
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या सन्मानार्थ तळेगावातील आस्थापना बंद
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन

