

पवनानगर : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. प्रशासनाने मराठी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्याच्या सूचना देण्यात आले होते. पवना विद्या मंदिर,लायन शांता मानेक ज्युनियर कॉलेज तसेच कै. सौ. मिराबाई दशरथ भोंगाडे पवना प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील सर्व नविन विद्यार्थांंचे आज मावळचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या हस्ते पहिल्याच दिवशी पुस्तके व झांडाचे रोपे देऊन जोरदार स्वागत करण्यात आले .
विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुलाबांच्या पाकळ्यांची उधळण करत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या संकल्पनेतून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संस्था अंर्तगत शाळांमध्ये एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन या उपक्रमाची सुरुवात आज गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आली होती त्यानुसार वाळुंज यांच्या हस्ते संकुलातील १००० विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक देशी झांडाचे रोप देण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज,शिक्षण विस्तार अधिकारी संदिप काळे,संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, केंद्रप्रमुख पांडुरंग डेंगळे,ॲड भरत ठाकर प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर ठाकर,पुणे जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष संजय मोहोळ,काले ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश कालेकर, माजी विद्यार्थी यांंच्यासह संकुलातील सर्व विभागाचे प्रमुख व सर्व अध्यापकांच्या हस्ते नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांंना पुस्तके तसेच झाडांचे वाटप करण्यात आली.
यावेळी बोलताना वाळुंज म्हणाले की, वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे त्यानुसार संस्था उपक्रमानुसार संकुलातील प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांना एक झाड देण्यात आले असून प्रत्येकाने त्यांचे लागवड करुन संवर्धन व संगोपन करणे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे .
एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी,पहिल्याच दिवशी ११००० वृक्षांचे वाटप झाले.नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संस्थेच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यावर्षी पासून एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे.
त्यानुसार संस्था अंर्तगत ६ माध्यमिक ,२ प्राथमिक,४ उच्च माध्यमिक विद्यालयात आज पहिल्याच दिवशी ११००० वृक्षांचे वाटप करण्यात आले आहे.
सदर उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ते झाड लावून त्याचे संवर्धन करावे त्याचे निरीक्षण व पाहणी करण्यासाठी एक समिती तयार करुन त्याचा अहवाल सादर केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला संस्थेमार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.हा उपक्रम संस्थेचे जेष्ठ सल्लागार माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, संचालक सोनबा गोपाळे, महेश शहा, दामोदर शिंदे व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु राहणार आहे.
- नगरपंचायत फंडातून वडगावात गतिरोधक
- हजारो जनसमुदायांच्या उपस्थित साश्रुनयंनी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना निरोप
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या सन्मानार्थ तळेगावातील आस्थापना बंद
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन
- मावळ शिवसेनेचे कृषी अधिका-यांना पीकविमा बाबत निवेदन

