ॲड. रामराजे भोसले पाटील पश्चिम महाराष्ट्र नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष नियुक्त

ॲड. रामराजे भोसले पाटील पश्चिम महाराष्ट्र नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष नियुक्त

पिंपरी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी ॲड. रामराजे जी. भोसले पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात राज्यसभेचे माजी खासदार  अमर साबळे, आमदार  शंकर जगताप (चिंचवड), आमदार  उमाताई खापरे (विधान परिषद), भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  अनुप मोरे, प्रदेशाध्यक्ष ॲड. सय्यद सिकंदर अली यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र सुपूर्त करण्यात आले.

कार्यक्रमाला कार्याध्यक्ष ॲड. यशवंत खराडे, सचिव ॲड. प्रवीण नलावडे, प्रदेश सदस्य ॲड. दिनकर बारणे, प्रदेश प्रवक्ते ॲड. शंकर वानखेडे, तसेच पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ॲड. आतिश लांडगे हे देखील उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना ॲड. रामराजे भोसले पाटील यांनी, “पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळताना मी पारदर्शक व संघटीत पद्धतीने काम केले. आता नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नोटरी वकिलांना अधिक सहकार्य, सन्मान आणि प्रोत्साहन मिळेल यासाठी प्रयत्नशील राहीन,” असे मत व्यक्त केले.

नवीन नियुक्तीसाठी ॲड. भोसले यांचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!