

वडगाव मावळ :
साते येथील जिल्हा परिषद अंगणवाडी, प्राथमिक शाळा आणि कै. नानासाहेब बलकवडे माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती.
वारकरी वेशातील विद्यार्थ्यांची पायी दिंडी टाळ मृदुंग समवेत ज्ञानोबा माऊली तुकाराम गजर करत शाळेपासून संपूर्ण गावात प्रदक्षिणा उत्साहात पोहोचली, मंदिर परिसरात लहान मुलांनी फेर धरत फुगड्या खेळत आनंद लुटला.
ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, शालेय व्यवस्थापन समिती आणि सर्व विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले होते.
- योगेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाभिमुख उपक्रम : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
- भक्तीच्या पावसात न्हालेली ग्रीन्स सोसायटीची दिंडी!
- साते गावात विठ्ठल नामाचा गजर
- आषाढी एकादशीनिमित्त नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान
- श्री. छत्रपती शिवाजी विद्यामंदिरात दिंडी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न


