
तळेगाव दाभाडे : मावळचे ज्येष्ठ नेते, शिक्षणमहर्षी आणि माजी आमदार कृष्णराव भेगडे (वय ८९) यांच्या सोमवार, ३० जून २०२५ रोजी रात्री ९ वाजता झालेल्या दुःखद निधनामुळे तळेगाव दाभाडे शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या सन्मानार्थ शहरातील सर्व व्यापारी आस्थापना आज मंगळवार, १ जुलै २०२५ रोजी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
तळेगाव व्यापारी महासंघाने कळकळीचे आवाहन करत सर्व व्यावसायिकांनी आपल्या आस्थापना बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करावी, असे सांगितले आहे. या बंदला शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. बंद शांततेत पार पाडावा आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे.
दरम्यान, तळेगावातील बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांनाही संस्थाचालकांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. शैक्षणिक संस्थांनी आपापल्या पातळीवर शोकसभा घेत भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्येही त्यांच्या जाण्याचे तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
- नगरपंचायत फंडातून वडगावात गतिरोधक
- हजारो जनसमुदायांच्या उपस्थित साश्रुनयंनी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना निरोप
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या सन्मानार्थ तळेगावातील आस्थापना बंद
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन
- मावळ शिवसेनेचे कृषी अधिका-यांना पीकविमा बाबत निवेदन

