
वन्यजीव रक्षकांनी अजगरास पकडून वनक्षेत्रात केली मुक्तता ; ग्रामस्थांनी मानले आभार
टाकवे बुद्रुक, ता. 29 : बोरज गावात आढळलेल्या 10 फूट लांबीच्या अजगराला वन्यजीवरक्षक मावळच्या सदस्यांनी पकडून त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आली आहे.
बोरज गावातील स्मशानभूमी परिसरात ता. 28 रोजी रात्री 9 च्या सुमारास निलेश बांगर यांना रस्त्याच्या बाजूस अजगर दिसल्याने त्यांनी याबाबत स्थानिक ग्रामस्थ पप्पू केदारी व बोरज गावचे पोलीस पाटील दिनेश केदारी यांना कल्पना दिली. पोलीस पाटील दिनेश केदारी यांनी तात्काळ वन्यजीवरक्षक दक्ष काटकर यांना अजगर आढळल्याची बातमी कळविल्यानंतर वन्यजीवरक्षक दक्ष काटकर, अनिल आंद्रे, यश वाडेकर हे त्याठिकाणी हजर झाले. सदर अजगर हा रस्त्याच्या बाजूला झुडपांत होता. त्यास अनिल आंद्रे आणि दक्ष काटकर यांनी त्यास व्यवस्थितरीत्या, काळजीपूर्वक पकडून त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली. यावेळी त्याठिकाणी उपस्थित पोलीस पाटील दिनेश केदारी, ग्रामस्थ नवनाथ कडू, तेजस केदारी, सोमनाथ केदारी, रवी केदारी, अमर कडू, अनिल केदारी, विठ्ठल ठुले, मनोज मांडेकर, पांडुरंग मोहळ, ओमकार केदारी यांनीही मदत करून आभार मानले.
मावळ भागात गेल्या काही दिवसात 9 अजगर साप पकडण्यात आले असून ते नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. गेल्यावर्षी याच बोरज गावाशेजारील डोंगरभागात 15 फूट लांबीचा अजगर आढळला होता. पावसाचे प्रमाणे अधिक असल्याने अजगर साप हे मानववस्थीकडे धाव घेत आहे असं यावेळी प्राणीमित्रांनी सांगितले.
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन
- मावळ शिवसेनेचे कृषी अधिका-यांना पीकविमा बाबत निवेदन
- बुद्धाला स्वीकारण्यासाठी पाली भाषेकडे वळले पाहिजे : डॉ. श्रीपाल सबनीस
- फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे यांचा दशवार्षिक स्नेह मेळावा संपन्न
- मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना, अध्यक्ष पदी सुदेश गिरमे अध्यक्ष,कार्याध्यक्ष पदी विशाल विकारी, सचिव पदी रामदास वाडेकर

