राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मावळ महिलाध्यक्ष पदी रत्नमाला करंडे


वडगाव मावळ: श्रीक्षेत्र देहू येथील माजी सरपंच रत्नमाला करंडे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ  शेवाळे,जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्या हस्ते करंडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.


यावेळी तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, अतुल राऊत,विशाल वहिले , प्रदीप काळोखे,संदीप शिंदे ,अमित घेनंद,विकास परंडवाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्षा करंडे म्हणाल्या, ” पक्षाचे विचार जनसामान्यांना पर्यंत पोहचवून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!