
वडगाव मावळ : श्री .पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या श्री पोटोबा महाराज मंदिरात मा राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, यांचे शुभहस्ते व ह भ प मंगल महाराज जगताप,संतोष महाराज काळोखे, नितीन महाराज काकडे, उद्योजक शंकरराव शेळके, मावळ तालुका दिंडी चे अध्यक्ष महादु सातकर यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये पंधराव्या अहवालाचे प्रकाशन झाले.
मावळ तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्री पोटोबा देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील पारदर्शक कारभार करणारे देवस्थान आहे असे गौरवउदगार भंडारा डोंगर दशमी समिती चे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशिद यांनी व्यक्त केले. श्री पोटोबा देवस्थान चे अहवालाचे काम पारदर्शक असल्यामुळे वारकरी संप्रदायाने तो आदर्श डोळ्यसमोर ठेऊन आपले पारमार्थिक काम करावे आणि तसेच व्यसनमुक्त मावळ तालुका बनवावा.
जीवन सुखी करावे असे मार्गदर्शक पर मनोगत हभप संतोष महाराज काळोखे यांनी व्यक्त केले. यावेळी देवस्थान चे उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, विश्वस्त भास्करराव म्हाळसकर,, सुखदेव महाराज ठाकर, दत्तात्रय महाराज शिंदे,यांनी मनोगत व्यक्त केले तसेच यावेळी देवस्थान च्या कार्याचा अहवाल व पुढील उद्देश अध्यक्ष किरण भिलारे यांनी सविस्तर पणे त्यांचे मनोगत मध्ये मांडला.
यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुकाअध्यक्ष,दत्तात्रय लायगुडे, उद्योजक शंकरराव शेळके,मा सभापती गुलाबराव म्हाळसकर,अखिल भारतीय वारकरी मंडळ अध्यक्ष दत्तात्रय लालगुडे, चार्टड अकाउंटंट किसनराव खाणेकर, पंढरीनाथ भिलारे, पंढरीनाथ ढोरे,मा मा. चेअरमन चंद्रकांत ढोरे, गंगाधर ढोरे,भरतशेठ म्हाळसकर,मनोजभाऊ ढोरे,मा नगरसेवक ऍड विजयराव जाधव, रविंद्र म्हाळसकर आदिसह तालुक्यातील वारकरी मंडळ व ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन देवस्थान चे अध्यक्ष किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे,विश्वस्त अनंता कुडे,चंद्रकांत ढोरे, ऍड अशोकराव ढमाले, तुकाराम ढोरे, सुनिता कुडे,यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थान चे विश्वस्त सचिव अनंता कुडे,स्वागत सुभाषराव जाधव,दत्तात्रय महाराज शिंदे यांनी केले.सूत्रसंचालन ह भ प गणेश महाराज जांभळे, व आभार नारायणराव ढोरे यांनी मानले.
- नगरपंचायत फंडातून वडगावात गतिरोधक
- हजारो जनसमुदायांच्या उपस्थित साश्रुनयंनी माजी आमदार कृष्णराव भेगडे यांना निरोप
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या सन्मानार्थ तळेगावातील आस्थापना बंद
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन
- मावळ शिवसेनेचे कृषी अधिका-यांना पीकविमा बाबत निवेदन

