रोटरी सिटीतर्फे वारकऱ्यांना रेनकोट व शबनम बॅग वाटप


तळेगाव दाभाडे :रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्था यांचे संयुक्त विद्यमाने पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके,रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे यांच्या हस्ते वारकऱ्यांना रेनकोट व शबनम बॅग वाटप  करण्यात आले.


यावेळी अध्यक्ष भगवान शिंदे, उपाध्यक्ष सुरेश दाभाडे, सेक्रेटरी संजय मेहता,क्लब ट्रेनर सुरेश शेंडे,माजी नगरसेवक सुर्यकांत काळोखे,रोटरी व काळोखे पतसंस्थेच्या पदाधिकाऱी उपस्थित होते.
गेली १० वर्ष सातत्याने रोटरी सिटी तर्फे राबविण्यात येणाऱ्या स्तुत्य उपक्रमाचे  उपमुख्यमंत्री  पवार यांनी कौतुक केले.वारकऱ्यांना पालखी प्रस्थान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देताना रोटरी सिटीच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी प्रास्ताविकाद्वारे क्लबच्या कार्यपद्धतीची माहिती विशद केली.


संस्थापक विलास काळोखे यांनी स्वागत केले. रोटरी सिटी प्रतिवर्षी वारकऱ्यांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून हा स्तुत्य उपक्रम भंडारा डोंगरावर घेत असते त्याचबरोबर अनेक समाज उपयोगी उपक्रम घेतले जातात असे प्रतिपादन भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष ह.भ.प.बाळासाहेब काशीद पाटील यांनी केले. आभार ह.भ.प.रविंद्र महाराज ढोरे यांनी केले.


उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रो.सुरेश धोत्रे,रो.नितीन शहा,रो.संग्राम जगताप,रो.निलेश राक्षे,रो.संजय चव्हाण,रो.राजेंद्र कडलक,रो.रामनाथ कलावडे,रो.डाॅ.गणपत जाधव,रो.दिलीप ढोरे,रो.अभिनेते मोहन खांबिटे,रो.संजय भागवत,रो.आनंद रिकामे,रो.विश्वास कदम,रो.तानाजी मराठे,रो.नवनाथ पडवळ,रो.नवनाथ म्हसे,रो.ॲड.लक्ष्मण घोजगे,रो.ॲड.रामदास काजळे,रो.पुंडलिक देशमुख रो.ॲड.वैशाली लगाडे,रो.राजेश बारणे,रो.नरेंद्र‌ ननावरे,रो.सुर्यकांत म्हाळसकर,काळोखे पतसंस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ काळोखे, संचालिका संध्या मांदळे, मनिषा कालेकर, रणजित वीर, चंद्रकांत चव्हाण इ.नी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.अत्यंत उपयोगी वस्तू रोटरी प्रतिवर्षी देत असते त्याबद्दल वारकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!