मनशक्ती फाऊंडेशन तर्फे येलघोल शाळेत वह्या वाटप व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात


पवनानगर :  मावळ तालुक्यात दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येलघोल येथे  विद्यार्थी व पालकांसाठी एक आनंददायी आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या, तसेच त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.
येलघोल येथील विद्यार्थी शेतकरी कुटुंबांमधील असल्याने त्यांना या मदतीची नितांत गरज होती. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अर्जुन घारे यांच्या प्रयत्नातून व मनशक्ती फाउंडेशन यांच्यातर्फे सुमारे ३० ते ३५ हजार रुपये किमतीच्या वह्यांचे वाटप करण्यात आले,
ज्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात त्यांच्यासाठी अधिक सुकर झाली. वह्यांच्या वाटपासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली. अनुभवी डॉक्टरांच्या पथकाने मुलांचे दात आणि शारीरिक तपासणी केली. आवश्यकतेनुसार पालकांच्या परवानगीने औषधेही देण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तक्रारींवर वेळीच उपचार करणे शक्य झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. अर्जुन घारे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती) यांनी भूषवले. मनशक्ती फाऊंडेशन यांच्या टीम सदस्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. श्री. सुहास गोसावी यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रतेचे महत्त्व समजावून सांगितले. एकाग्रतेमुळे अभ्यासात कशी प्रगती होते, हे त्यांनी सोप्या भाषेत पटवून दिले. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काही छोटे प्रायोगिक खेळही विद्यार्थ्यांकडून करून घेतले, ज्यामुळे त्यांना अभ्यासात नवी ऊर्जा मिळाली. डॉ. गोसावी यांनी दुर्गम भागातील शिक्षणाचे महत्त्व आणि शैक्षणिक प्रगतीबद्दल स्थानिक लोकांची उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक आणि शैक्षणिक अशा ‘खेळातून गणित अध्यापना’चे विविध खेळ घेण्यात आले, ज्यामुळे गणिताची भीती कमी होऊन ते अधिक आवडीचे झाले. सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या, ज्यामुळे त्यांच्यात एक नवा उत्साह संचारला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. सुरेश तांदळे यांनी केले, तर पदवीधर शिक्षक श्री. संतोष भेगडे यांनी उपस्थित मान्यवर आणि पालकांचे आभार मानले.
या प्रसंगी सौ. प्रियंका घारे (सरपंच, येलघोल), श्री. सुखदेव घारे, श्री. जयवंत घारे (माजी सरपंच), श्री. प्रदीप घारे, नरेश भरणे (सामाजिक कार्यकर्ते), डॉ. ओम भाऊसार, श्री. चेतन वेदक, श्रीमती अल्पना पाफाळे, श्रीमती शांती ताई, श्रीमती मेहेर ताई, श्री. नंदकिशोर खंडेलवाल, श्री. उमेश भुतडा सौ. वैशाली घारे (उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती),सौ. सीमा शेडगे, सौ वैशाली सुनिल घारे,सौ.पुर्णिमा कदम हे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,तसेच अंगणवाडी सेविका सौ. कुंदाताई ठाकर. व श्रीम.ताईबाई घारे उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे येलघोल शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची आवड आणि आरोग्य जागरूकता वाढण्यास नक्कीच मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!