आदिमाया आदिशक्ती
तत्त्व एकच,आत्मतत्व
“चैतन्यशक्ती
या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नऊ दिवस, जीवनविद्येच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर असलेली, *”दुसरी माळ”* देवीला अर्पण करू या!
१) समता … *२) सभ्यता …* ३) सामंजस्य
४) सहिष्णुता … ५) समाधान …
६) लवचिकता … ७) नम्रता … ८) कृतज्ञता
९) “विश्वप्रार्थना”
मानवी संस्कृतीचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे, …
सभ्यता :* सभ्यपणाने वागणे (Cultured) म्हणजे कसे वागावे, कसे बोलावे, कसे चालावे, परस्परांशी कसे संबंध ठेवावे हे ज्याला समजते त्याला *सभ्य माणूस* (Well cultured) असे म्हणावे. म्हणून ….
जीवनविद्येने सभ्यतेला महत्त्वाचे स्थान दिले आहे.
आपल्या समाजात कितीतरी पुरुष दारु पिऊन बायकांना मारतात ?
रागाने, पैशाच्या लोभाने मारतात ?
आई-वडिलांकडून स्कूटर घेऊन ये, असे सांगून सूनबाईला छळतात ?हा सर्व असभ्यपणा आहे. जीवनविद्येला तो मान्य नाही.
दुसऱ्यांचा आदर करणे, मन जपणे, कर्तव्याच भान वागताना-बोलताना ठेवणे आणि *त्यातून परस्परांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करणे हे सभ्यतेच लक्षण आहे.*
सभ्यतेसाठी आदर्श घ्यावा तो “शिवछत्रपतींचा”!*
अफजलखानाचा वध केल्यानंतरही *प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचे स्मारक बांधणारे “शिवराय”!*
रायगडावर डागडुजी करताना *सापडलेल्या पवित्र कुराणांच्या प्रतीचा मान ठेवणारे “शिवराय”!*
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा अवमान न करता साडी-चोळी देऊन *तिचा यथोचित सन्मान करणारे “शिवराय”! आपल्या प्रत्येक कृतीतून सभ्यतेचा पाठ आपल्याला शिकवतात*
माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागणे ही “सभ्यता” आहे व परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे हे “सभ्यतेचे लक्षण” आहे असे जीवनविद्या आवर्जून सांगते.*
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
(ग्रंथ : परमेश्वर आहे का ?
असेल तर तो दिसत का नाही?)
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित