वडगाव मावळ:
वडगाव मावळ नगरपंचायतीचे  नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या संकल्पनेतून वडगाव शहरात “तुटलेला चेंबर दाखवा..अन् नगराध्यक्षांच्या माध्यमातून..नवीन चेंबर बसवा.” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमा दरम्यान नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी वडगाव शहरातील रहिवाशांना आवाहन केले की आपल्या घराशेजारील, सोसायटीतील अथवा नजीकच्या परिसरातील एखादा चेंबर तुटलेल्या अवस्थेत असेल तर तो चेंबर नगराध्यक्ष फंडातून त्वरीत दुरूस्त करून घ्यावा अथवा पूर्ण नादुरुस्त असलेल्या चेंबर ऐवजी नवीन चेंबरचे बांधकाम फक्त दहा दिवसांतच करून दिले जाईल.

या अभिनव उपक्रमामुळे वडगाव नगरपंचायत हद्दीतील तुटलेल्या चेंबर मधून दुर्गंधी पसरणार नाही तसेच नागरिकांना घराशेजारील परिसरातून ये-जा करताना नाहक त्रास होणार नाही तसेच मच्छर व रोगराई पासून आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मदत होईल.

सामाजिक बांधिलकीतून सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे गेल्या पंधरा दिवसांतच शहरातील सुमारे ३६ चेंबर ची कामे मार्गी लावण्यात आल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
आपल्या परिसरातील तुटलेला चेंबर दुरूस्त करण्यासाठी ९८२२८३८८२३ या दूरध्वनी क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा असेही आवाहन नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केले आहे.

स्वच्छ वडगाव साठी, एकमेका साहाय्य करू..
दिसता फुटका चेंबर नगराध्यक्षांना फोन करू..! अशी या अभिनव उपक्रमाची थीम आहे.

error: Content is protected !!