
युवा सेनेच्या ‘ मावळ तालुकाध्यक्ष पदी ‘ राजेश वाघोले
वडगाव मावळ : युवा सेनेच्या ‘ मावळ तालुकाध्यक्ष पदी ‘दारुंब्रे येथील राजेश वाघोले यांची निवड करण्यात आली. युवासेनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, महाराष्ट्र राज्याचे सचिव किरण साळी, , युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी वाघोले यांची नियुक्ती जाहीर केली.
वाघोले यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, ” वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमूख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेश नुसार खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपली निवड करण्यात आली आहे.
राजेश वाघोले म्हणाले,” खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे धनुष्य बाण हाती धरला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून जनेतेची सेवा करण्याचा संकल्प केला आहे. जनसेवा हिच ईश्वर सेवा करण्याचा माझा प्रयत्न आहे. युवा सेनेचे तालुकाध्यक्ष पद मिरवण्यासाठी नाही याचे मला भान आहे.
तरुणांनी आवाज उठवण्यासाठी आहे, शिक्षण, रोजगार, सक्षमीकरणासाठी लढणे यासाठी आहे.शिवसेनेच्या मूल्यांना आणि दृष्टिकोनाला नवीन बळ देण्यासाठी आहे. डॉ.खासदार श्रीकांत शिंदे,युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक,युवा सेना सचिव पश्चिम महाराष्ट्र विश्वजित बारणे यांचे आभार मानतो.मी फक्त स्वप्न पाहत नाही, मी कृतीवर विश्वास ठेवतो सर्वांच्या आशीर्वादाने, पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाने, विश्वासाने बदल घडवून आणण्यासाठी, नेतृत्व करण्यास तयार आहे.
वाघोले म्हणाले, ” प्रगतीशील, समावेशक आणि गतिमान अशा शिवसेनेच्या दिशेने मी जात आहे. मी शिवसेना मध्ये प्रवेश केला आहे.या पक्षाच्या माध्यमातून मी नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे.शिवसेनेच्या विचारांना,ध्येयांना,साथ देईल. मी माझ्या कार्याला एक नवीन दिशा देऊ शकेल असा विश्वास आहे. या नवीन भूमिकेसाठी मी तयार आहे.
