सातत्य, चिकाटी आणि धाडसातून उभारलेल्या ‘  तन्मय ‘   इंटरप्रायझेसचा संघर्षमय प्रवास कौतुकास्पद

सातत्य, चिकाटी आणि धाडसातून उभारलेल्या ‘  तन्मय ‘   इंटरप्रायझेसचा संघर्षमय प्रवास कौतुकास्पद

भंडारा डोंगरावरील मंदीर उभारणीसाठी एक लाखाची देणगी
तळेगाव दाभाडे : दूध उत्पादक शेतकरी  ते उद्योजक असा पल्ला गाठणा-या बळीराम मराठे यांचा संघर्षमय प्रवास कौतुकास्पद आहे. सातत्य, चिकाटी आणि धाडसी स्वभावातून उभारलेल्या तन्मय इंटरप्रायझेसने औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
पंधरा टनच्या पाच व पन्नास टनाची एक अशा सहा क्रेनचे पूजन करण्यात आले. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) व भक्तीनिष्ठ वैराग्य मुर्ती श्री ह.भ.प. शंकर महाराज मराठे व भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष  ह.भ.प. बाळासाहेब महाराज काशिद यांच्या शुभ हस्ते पुजा करण्यात आली.

या क्षणाचे औचित्य साधून   भंडारा डोंगरावर बांधण्यात येत असलेल्या जगदगुरु श्रीसंत तुकाराम यांच्या मंदिर बांधकामासाठी एक लक्ष रूपायाची देणगी देण्यात आली.भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष  बाळासाहेब  काशिद यांच्या कडे ही देणगी  सुपूर्त करण्यात आली.  मारूती गिरमा मराठे व सविंद्राबाई मारूती मराठे ,बळीराम मारूती मराठे ,संतोष मारूती मराठे ,तन्मय बळीराम मराठे ,पृथ्वीराज बळीराम मराठे,साहील भरत मालपोटे यांच्या हस्ते ही देणगी देण्यात आली.
यावेळी ह.भ.प.भरत महाराज काळे,ह.भ.प. दत्तात्रय महाराज हजारे ,उद्योजक भरत घोजगे ,माजी उपसरपंच संदिप गायकवाड,सुखदेव पडवळ ,कैलास पडवळ ,संदिप दाभाडे , रामेश्वर पारखे,गोविंद गुंजाळ ,शंकर बधाले,महेश मराठे,गणेश मराठे ,मोहन मराठे ,दिनेश मराठे ,स्वप्नील चव्हाण,दादाभाऊ मराठे ,दसरथ मराठे,तेजस मराठे,विकास मोरे उपस्थित होते. शिवकुमार धुरीया यांनी स्वागत केले.साहील सुतार यांनी सुत्रसंचालन केले.साहील भरत मालपोटे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!