
सातत्य, चिकाटी आणि धाडसातून उभारलेल्या ‘ तन्मय ‘ इंटरप्रायझेसचा संघर्षमय प्रवास कौतुकास्पद
भंडारा डोंगरावरील मंदीर उभारणीसाठी एक लाखाची देणगी
तळेगाव दाभाडे : दूध उत्पादक शेतकरी ते उद्योजक असा पल्ला गाठणा-या बळीराम मराठे यांचा संघर्षमय प्रवास कौतुकास्पद आहे. सातत्य, चिकाटी आणि धाडसी स्वभावातून उभारलेल्या तन्मय इंटरप्रायझेसने औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
पंधरा टनच्या पाच व पन्नास टनाची एक अशा सहा क्रेनचे पूजन करण्यात आले. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) व भक्तीनिष्ठ वैराग्य मुर्ती श्री ह.भ.प. शंकर महाराज मराठे व भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब महाराज काशिद यांच्या शुभ हस्ते पुजा करण्यात आली.
या क्षणाचे औचित्य साधून भंडारा डोंगरावर बांधण्यात येत असलेल्या जगदगुरु श्रीसंत तुकाराम यांच्या मंदिर बांधकामासाठी एक लक्ष रूपायाची देणगी देण्यात आली.भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्या कडे ही देणगी सुपूर्त करण्यात आली. मारूती गिरमा मराठे व सविंद्राबाई मारूती मराठे ,बळीराम मारूती मराठे ,संतोष मारूती मराठे ,तन्मय बळीराम मराठे ,पृथ्वीराज बळीराम मराठे,साहील भरत मालपोटे यांच्या हस्ते ही देणगी देण्यात आली.
यावेळी ह.भ.प.भरत महाराज काळे,ह.भ.प. दत्तात्रय महाराज हजारे ,उद्योजक भरत घोजगे ,माजी उपसरपंच संदिप गायकवाड,सुखदेव पडवळ ,कैलास पडवळ ,संदिप दाभाडे , रामेश्वर पारखे,गोविंद गुंजाळ ,शंकर बधाले,महेश मराठे,गणेश मराठे ,मोहन मराठे ,दिनेश मराठे ,स्वप्नील चव्हाण,दादाभाऊ मराठे ,दसरथ मराठे,तेजस मराठे,विकास मोरे उपस्थित होते. शिवकुमार धुरीया यांनी स्वागत केले.साहील सुतार यांनी सुत्रसंचालन केले.साहील भरत मालपोटे यांनी आभार मानले.
- ‘ मित्रत्व जीवनगंगेचे ‘ बलस्थान – राजन लाखे
- सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध – आयुक्त शेखर सिंह
- मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या वडगावात ध्वजारोहण
- राज्यात प्राथमिक आरोग्य सेवेचे जाळे निर्माण करणार : फडणवीस
