
वसुंधरा फाउंडेशन व महान राष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशनचा उपक्रम
तळेगाव दाभाडे :जागतिक पर्यावरणा दिनाचे औचित्य साधून श्रीसंत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वसुंधरा फाउंडेशन व महान राष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले,उपाध्यक्ष अनिल लोखंडे,संचालक मंडळ ,अधिकारी, कामगार वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण झाले.
सुमारे १००० हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प वसुंधरा फाउंडेशन व महान राष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशनने केला आहे. त्यापैकी सुमारे ३५० रोपांची लागवड करण्यात आली. कारखान्याच्या पत्र व्यवहारानुसार वसुंधरा फाउंडेशन चें संस्थापक अध्यक्ष किशोर शिवाजी गराडे व महान राष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कमलेश प्रकाश राक्षे यांच्या पुढाकारातून हे वृक्षारोपण करण्यात आले.
महान राष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कमलेश राक्षे म्हणाले,” झाडांचे म्हत्व सर्वश्रुत आहे, आपल्या आयुष्यात वृक्ष खूप महत्त्वाचे आहे. पर्यावरण सौंदर्य या व्यतिरिक्त झाडे खूप काही करतात. आपल्या आजूबाजूचा कार्बन डायऑक्साइड सोशून, आपल्याला प्राणवायू देतात. झाडे आपले उनापासून सौरक्षण करतात. झाडे आपल्या मुलांच्या मदतीने, जमिनीला घट्ट धरून ठेवतात ज्याने करून माती पावसात वाहून जात नाही. मंग्ररूव झाडे त्सुनामी पासून आपले सौरक्षण करतात.
झाडे लावा झाडे जगवा ही नुसती म्हण न राहता तिचे अनुकरण झाले पाहिजे यासाठी आमचा हा प्रयत्न असल्याचे राक्षे यांनी सांगितले. वृक्षारोपण पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण झाडे आपल्याला ऑक्सिजन पुरवतात, हवेची गुणवत्ता सुधारतात, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, जमिनीला धूप आणि पूर यांपासून संरक्षण करतात, आणि हवामानावर सकारात्मक परिणाम करतात. याव्यतिरिक्त, झाडे आपल्याला अन्न, औषध आणि इतर अनेक आवश्यक गोष्टी पुरवतात याकडे त्यांनी लक्ष वेधले.
- ‘ मित्रत्व जीवनगंगेचे ‘ बलस्थान – राजन लाखे
- सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध – आयुक्त शेखर सिंह
- मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या वडगावात ध्वजारोहण
- राज्यात प्राथमिक आरोग्य सेवेचे जाळे निर्माण करणार : फडणवीस
