रोटरी सिटी तर्फे ‘शौर्य गौरव पुरस्कार’ सोहळा संपन्न

रोटरी सिटी तर्फे ‘शौर्य गौरव पुरस्कार’ सोहळा संपन्न

इंदोरी :
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व साई क्रेन सर्व्हिस, इंदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शौर्य गौरव पुरस्कार’ वितरण समारंभ इंदोरी येथील हनुमान मंदिर सभागृहात उत्साहात पार पडला. कुंडमळा येथे साकव पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जीव धोक्यात घालून बचाव कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींना या वेळी गौरविण्यात आले.

रोटरी सिटीचे डायरेक्टर संजय चव्हाण यांच्या परमपूज्य वडील कै. दत्तात्रय सदू चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या विशेष पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दुर्घटनेच्या काळात अनेकांनी जीव धोक्यात घालून मदतकार्य केले. अशा ११ शौर्यवीरांचा रोटरी सिटी व साई क्रेन सर्व्हिसच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांनी “याजसाठी केला होता अट्टहास…” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित विचार मांडले. त्यांनी मानवी जीवनातील दुर्गुण टाळून सेवा, नम्रता व सद्वर्तन यांचे महत्त्व उलगडले. समाजहिताचे कार्य करत असताना ‘अहंकार’, ‘मत्सर’ यांचा त्याग करून सकारात्मक जीवन जगावे, असा संदेश त्यांनी दिला.

रोटरी क्लबचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी रोटरी सिटीच्या आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामुदायिक विकास या क्षेत्रांतील कार्याचा आढावा घेत उपक्रमाचा उद्देश विशद केला. संस्थेच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांसाठी सेवा हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे, ह.भ.प. बाळासाहेब काशीद पाटील, माजी सरपंच संदीप काशीद पाटील, दिलीपशेठ ढोरे, अतुल पवार, प्रशांत भागवत, नंदकुमार भसे महाराज, रामभाऊ कराळे पाटील, संजय मेहता, सुरेश शेंडे, संग्राम जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कुंडमळा पूल दुर्घटनेत बचाव कार्यात उल्लेखनीय सहभाग असलेल्या गौरव विनायक भेगडे, संभाजी भिमदास पवार, सागर विनायक भेगडे, श्रीकांत भेगडे, भास्कर माळी मामा, मुन्ना अरसुले, संगपाल विकास लबडे, रामा पडवळ, संदीप सुभाष ढोरे, एन. डी. आर. एफ. सुदुंबरे टीम व तळेगाव आंबी एमआयडीसी टीम यांना भव्य गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय चव्हाण, राजेंद्र कडलक, चव्हाण परिवार, इंदोरी ग्रामस्थ, रोटरी सिटीचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रो. डॉ. मिलिंद निकम व रंगनाथ चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश दाभाडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.

या वेळी सुरेश दाभाडे, संजय मेहता, सुरेश शेंडे, संग्राम जगताप, निलेश राक्षे, बळीराम मराठे, विश्वास कदम, रघुनाथ कश्यप, रामनाथ कलावडे, मोहन खांबेटे, संजय भागवत, आनंद रिकामे, सुनंदा वाघमारे, वर्षा खारगे, वैशाली लगाडे, स्वाती मुठे, तानाजी मराठे यांच्यासह चव्हाण व कडलक परिवार व इंदोरी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!