
लोणावळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोणावळा शहराध्यक्षपदी रवि दत्तात्रय पोटफोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी त्यांची निवड केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, ज्येष्ठ नेते नारायण पाळेकर, सुकाणू समिती सदस्य जीवन गायकवाड, माजी अध्यक्ष विलास बडेकर, दिलीप पवार, मंजुश्री वाघ, आरोही तळेगावकर, सनी पाळेकर, सोमनाथ गायकवाड, जयेश देसाई, सुनील आसवले, रामचंद्र दुर्गे, छगन ठाकर, मारुती साठे, अंश घोणे, जाकीर खलिफा, अतुल कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन शहराध्यक्ष रवि पोटफोडे यांनी म्हणाले”, “आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. लोणावळा शहरात पक्षबांधणी, जनतेचा सहभाग आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यावर माझा भर राहील.
- माजी नगरसेवक सचिन टकले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सरकारी योजनांच्या शिबिराचे आयोजन
- नेफ्रोटिक सिंड्रोमग्रस्त तीन वर्षीय बालकाची यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून सुटका
- “अर्थव्यवस्थेचे पंचप्राण” राज्यस्तरीय पुरस्काराने उद्योजक विलास काळोखे सन्मानित – ४० वर्षांच्या यशस्वी उद्योग कारकिर्दीचा गौरव
- देहूत न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा ऑलिम्पियाड स्पर्धेत दैदिप्यमान यश : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला
- स्पर्श हॉस्पिटलच्या वतीने मावळमध्ये भव्य मोफत महाआरोग्य शिबिर

