
“सक्षम तू अभियान” अंतर्गत विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजितदादा पवार गट प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे जिल्हा अध्यक्ष मोनिकाताई हरगुडे आणि मावळ तालुका महिला अध्यक्ष सुवर्णाताई राऊत यांच्या अध्यक्षतेखाली, मावळ तालुका ओबीसी सेल महिला अध्यक्षा संध्या थोरात आणि ओबीसी सेल महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने १८ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता सोमाटणे गावातील तुळजाभवानी विद्यालय येथे नववी आणि दहावीच्या मुलींना उद्देशून “सक्षम तू अभियान” ही योजना राबवण्यात आली.
तुळजाभवानी विद्यालय मधील मुख्याध्यापक गिरी गोसावी सरांनी सर्वांचे स्वागत केले. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मधील दामिनी पथकातील LPC/2981 जाधव मॅडम व LPC/3826 पोकळकर मॅडम यांनी वाढती गुन्हेगारी, आत्मसंरक्षण, पोलिस टोल फ्री माहिती, POSCO कायदा, बालकांचे लैंगिक शोषण, इतर कायदेविषयक माहिती व पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे स्वागत सोमाटणे गावच्या माजी सरपंच नलिनीताई गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक ओबीसी सेल महिला अध्यक्षा संध्या थोरात यांनी केले. मावळ तालुका महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन तळेगाव ओबीसी सेल शहराध्यक्ष नीलिमा शिंदे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व ओबीसी महिला पदाधिकाऱ्यांनी मोलाची मदत केली. त्यामध्ये मावळ तालुका ओबीसी सेल उपाध्यक्ष धम्मप्रिया बनसोडे, तळेगाव ओबीसी सेल कार्याध्यक्ष महालक्ष्मी शेटे यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमासाठी महिला पदाधिकारी म्हणून दिव्यांग सेल अध्यक्षा ज्योतीताई राजीवडे, अल्पसंख्याक सेलच्या शबनम भाभी, तळेगाव युवती शहराध्यक्ष प्रिया मोडक, उपाध्यक्ष वैष्णवी, माजी युवती अध्यक्ष आरती घारे, उपाध्यक्ष मोहिनीताई काळे या उपस्थित होत्या.
शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी उत्तम नियोजन करत कार्यक्रमाची आखणी केली होती.
- माजी नगरसेवक सचिन टकले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सरकारी योजनांच्या शिबिराचे आयोजन
- नेफ्रोटिक सिंड्रोमग्रस्त तीन वर्षीय बालकाची यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून सुटका
- “अर्थव्यवस्थेचे पंचप्राण” राज्यस्तरीय पुरस्काराने उद्योजक विलास काळोखे सन्मानित – ४० वर्षांच्या यशस्वी उद्योग कारकिर्दीचा गौरव
- देहूत न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा ऑलिम्पियाड स्पर्धेत दैदिप्यमान यश : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला
- स्पर्श हॉस्पिटलच्या वतीने मावळमध्ये भव्य मोफत महाआरोग्य शिबिर

