टाकवे बुद्रुक : आपल्या घराला अन् गावाला जाणारा रस्ता आहे.तसा देवाजवळ जाण्याला ही मार्ग आहे. आणि हाच मार्ग संत दाखवतात.संतानी आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग दाखवला तोच अनुग्रह आहे अशी स्पष्टोक्ती ह. भ. प. समर्थ सद्‌गुरू पांडुरंग महाराज रसाळ यांनी दिली.
महंतयोगी सद्‌गुरू किसननाथबाबा व सद्‌गुरू शंकर महाराज रसाळ (दादा) यांच्या आज्ञांकित शिष्य परिवाराच्या वतीने कल्हाट, ता. मावळ येथे झालेल्या सदगुरू पूजन सोहळ्यात समर्थ सद्‌गुरू पांडुरंग महाराज रसाळ बोलत होते.
गजर गुरू नामाचा, सोहळा आनंदाचा याची अनुभूती श्रोते मंडळींनी यावेळी अनुभवली.सदगुरू सारखा सोयरा जीवलग ! तोडिला उद्वेग संसारीचा !! या संत नामदेव महाराजांच्या अभंगाचे  निरूपण करीत त्यांनी किर्तन पष्प  गुंफले. गुरू शिष्य परंपरेच्या अनेक  उदाहरणांची दाखले देत त्यांनी गुरू शिष्याचे नाते दृढ केले.पाद पूजन, मिरवणूक, प्रवचन, किर्तन, हरिजागर आदि धार्मिक झाले. अन्नदान करण्यात आले. ह.भ.प. भागवताचार्य किसन महाराज धंद्रे यांचे प्रवचन झाले.
सद्गुरूपुजन निष्कर्मयोगी बालकनाथ बाबा व समर्थ सद्‌गुरू पांडुरंग महाराज रसाळ महाराज यांची भव्य मिरवणूक काढून रांगोळी व गुलाब फुलांच्या पायघड्या घालून त्यांचे स्वागत केले. पांडुरंग महाराज रसाळ म्हणाले,” परमार्थ सोपा नाही आणि अवघड नाही. गुरू कृपेमुळे परमार्थ सहज आणि सोपा आहे. ज्या नामाने देवाची प्रचिती येते ते नाम सदगुरू देत असतात.
कल्हाट, भोयरे, कशाळ, किवळे, इंगळ्ण, पारिठेवाडी, अनसुटे, मानकुली, कुणे, वहानगाव, माळेगाव, खांडी, नागाथली, शिंदेवाडी, घाटेवाडी, माऊ, वडेश्वर, फळणे, टॉकवे, कॉडिवडे, निगडे, आंबळे, मंगरूळ, नवलाखऊंने, मुंबई, कोळीये, टेकवडी, आडगांव, गडद, पवळेवाडी, देवतोरणे, अहीरे, पाईट, हेद्रज, डोणे, दिवाड, वाऊंड, पराळे, नायगाव वाकसई, तुंगार्ली, वारंगवाडी, आंबी, कचरेवाडी, घोणशेत, खरमारवाडी, डाहुली, बोरवली, कान्हेतील साधक उपस्थित होते.कल्हाट ग्रामस्थ व गुरू बंधू यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!