अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पुण्यात होणार 

प्रतिनिधी श्रावणी कामत                                            पिंपरी – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा पुण्यात होणार असून या कार्यशाळेत यु ट्यूब,पोर्टल चे संपादक व सर्व पत्रकारांसाठी खास आकर्षण असणार आहे. गुगल आणि यु ट्यूब कडून बेनिफिट मिळण्यासाठी काय करावे लागणार या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन लाभणार आहे. एकंदरीतच ही पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे सर्वेसर्वा मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये बैठक घेण्यात आली. तसेच संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या..

बैठकीमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे,मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले,कार्याध्यक्ष अविनाश आदक,उपाध्यक्ष सुरज साळवे,

डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष महावीर जाधव,विनय सोनवणे, राजकुमार शेंडगे,पराग

डिगनकर,समन्वयक पुणे जिल्हा मारुती बाणेवार,सागर सूर्यवंशी नितीन कालेकर,किसन भोसले, रमेश साठे सह आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!