पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा सुरूच रविंद्र भेगडे यांचा निर्धार
पवनानगर: बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प जो पर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असा निर्धार मावळ भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी व्यक्त केला.क्रांतीदिनी येळसेतील शहीद स्मृतिस्थळावर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व शेतकरी यांच्या उपस्थितीत स्मृतिस्थळावर भेगडे यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे,माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी सभापती एकनाथराव टिळे , मावळ भाजपा अध्यक्ष दत्तात्रय गुंड,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,माजी उपसभापती शांताराम कदम,भाजपा प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुळे, तालुका सरचिटणीस अभिमन्यू शिंदे, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे,सुमित्रा जाधव,मावळ तालुका आर.पी.आय अध्यक्ष लक्ष्मण भालेराव,मावळ तालुका भाजपा ओबीसी आघाडी अध्यक्ष श्शरद साळुंखे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आडकर,नारायण बोडके, गणेश भाऊ ठाकर, निलेश ठाकर उपस्थित होते.
९ ऑगस्ट २०११ रोजी क्रांतीदिनी पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनात पोलीसांकडून झालेल्या गोळीबारात कै कांताबाई ठाकर , कै. मोरेश्वर साठे आणि कै. शामराव तुपे यांना जीव गमवावा लागला होता.या शहीद शेतक-यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दरवर्षी आभिवादन केले जाते.या दुर्दैवी घटनेला १३ वर्षे पूर्ण झाले.
या घटनेला उजाळा देत,रविंद्र भेगडे यांनी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला विरोध दर्शवला. आम्ही मावळच्या शेतकऱ्यांसोबत असल्याचा पुनरुच्चार केला. रविंद्र भेगडे म्हणाले , ” शेतकऱ्यांनी आपल्या न्यायहक्कांसाठी उभारलेला लढा आणि त्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या प्राणांचे दिलेले सर्वोच्च बलिदान यांचे उदाहरण देशाच्या इतिहासात अजरामर झालेले आहे. काहीही झाले तरी , पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प जो पर्यंत कायमस्वरूपी रद्द होत नाही तो पर्यंत आमचा लढा सुरू होता आहे व सुरूच राहील.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष