वडगाव मावळ: आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरामधील ठाकर समाजातील सुमारे १० कुटुंबीयांना आज जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज देखील भरण्यात आले. यावेळी वडगाव शहरातील ठाकर समाजातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरामधील ठाकर समाजातील सुमारे १० कुटुंबीयांना आज जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज देखील भरण्यात आले. यावेळी वडगाव शहरातील ठाकर समाजातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
या समाजातील कुटुंबीयांचा ताण कमी करण्यासाठी शासकीय स्तरावर आमदार सुनील शेळके जनसंपर्क कार्यालयाच्या सहकार्यातून तसेच मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून या समाजातील बांधवांना जातीचे दाखले देऊन खूप वर्षाचा प्रश्न मार्गी लावल्याने आज खरे समाधान भेटल्याची भावना मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी व्यक्त केल्या .
या व्यतिरिक्त अजूनही ठाकर समाजातील काही कुटुंबीयांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी शासन स्तरांवर पाठपुरावा सुरू आहे. आज भेटलेल्या दाखल्यांमुळे खूप वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागल्याने या समाजातील गोरगरीब रहिवाशांनी समाधान व्यक्त करत आमदार साहेबांचे आणि नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांचे विशेष आभार मानले.
वडगाव शहरातील ठाकर, आदिवासी, कातकरी समाजातील अनेक बांधव जातीच्या दाखल्यापासून वंचित असल्याने शैक्षणिक कामांसाठी तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र अत्यावश्यक असते. परंतु ज्यांचे पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते तसेच भूमिहीन होते अशा कुटुंबातील नागरिकांना तसेच त्यांच्या पाल्यांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो व वेळोवेळी दाखला काढण्यासाठी लागणा-या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असतात.
या समाजांतील कुटुंबीयांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आमदार सुनिल शेळके जनसंपर्क कार्यालयातील सचिन वामन, रुपेश सोनुने, यशवंत शिंदे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत “मदत नव्हे कर्तव्य” या सामाजिक बांधिलकीतून आज मोरया प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयात या कुटुंबीयांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ठाकर समाजातील रहिवाशी उपस्थित होते.