पिंपरी:महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने भव्य वृक्षारोपण करण्यात आले.आज केलेले वृक्षारोपण व संवर्धन म्हणजे उद्याच्या पिढीच्या ऑक्सिजनची सोय असा सल्ला महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त रवराज येळवे यांनी दिला.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने चांकण वनपरिक्षेत्र वराळे गावच्या बाजूला असलेल्या वनजमिनीवर  वड, पिंपळ, आंबा, कुरंज,जांभूळ यासारखे चारशे देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 

सध्या येणाऱ्या हलक्या पावसाच्या सरीचा आनंद घेत जवळपास ८० विविध कंपन्यांचे कामगार,  गुणवंत कामगार, विविध कंपणी,व प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवला.फक्त पर्यावरण दिनानिमित्त झाडे न लावता पावसाळ्यात अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत.

माझ्यामुळे, वृक्षतोड होणार नाही मी प्रत्येक वर्षी पाच झाडे लावून ती जगेल अशी भीष्म प्रतिज्ञा प्रत्येकाने घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

 जगामध्ये पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे, सूर्य आग ओकतोय,प्रदूषण वाढत चालले आहे ,”जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा, सोयरे वनचरे” अभंगाप्रमाणे आम्ही अधिकाधिक झाडे लावून प्रत्येकाने महिन्यातून एक दिवस तरी पर्यावरणासाठी दिला पाहिजे असे परखड मत महाराष्ट्राचे कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी मांडले.

एकीकडे आषाढी वारी  निघाली तर दुसरीकडे आषाढाच्या पहिल्या दिवशी वृक्षारोपण केल्यामुळे खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी गुणवंत कामगार अण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण टाळा, वृक्षतोड टाळा असा जनजागृतीचा शर्ट घालुन पर्यावराणाचा संदेश दिला.

कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे व त्यांच्या पत्नी सुजाता  इळवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी वनरक्षक सागर चव्हाण, ओम पवार वनरक्षक यांचा यावेळी आयुक्त इळवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .

सर्व कामगारांना कामगारभुषण डॉ मोहन गायकवाड यांच्या वतीने वनभोजन देण्यात आले .

यावेळी कामगार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे व पत्नी सुजाताताई इळवे ,पुणे गट कल्याण उपायुक्त मनोज पाटील ,संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कामगारभुषण डॉ.मोहन गायकवाड , केंद्र संचालक प्रदीप बोरसे, अनिल कारळे, अरुण वाढकर,सुनील बोराडे, अविनाश राऊत ,विविध केंद्राचे केंद्र संचालक उपस्थित होते तर निरीक्षक संदीप गावडे ,कर्मचारी प्रमोद चौधरी, प्रतिभा एरम,शुभांगी नावडीकर,सुरेश पवार मा.केंद्र संचालक,दहीतुले मँडम,सह वनरक्षक अमोल पवार, सागर चव्हाण ,अचल गवळी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

अमोल सातपुते वनसंरक्षक जुन्नर, संदेश पाटील सहाय्यक वनसंरक्षक संतोष कंक वनपरिक्षेत्र अधिकारी,योगिता वीर वनपाल श्री अचल गवळी वनपाल चाकण यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या जातीचे झाडे लावून वृक्षरोपण करण्यात आले .

यावेळी संस्कार प्रतिष्ठानचे प्रभाकर मेसकर, मिलन गायकवाड ,तानाजी भोसले, राजेंद्र फडतरे, अनुषा पै सायली सुर्वे ,संध्या स्वामी, शिवराज शिंदे, गुणवंत कामगार काळूराम लांडगे, मुलांनी बशीरभाई, शंकर नाणेकर, गोरखनाथ वाघमारे ,संदीप पानसरे, मुरलीधर दळवी, सुनील खैरनार, बाळासाहेब साळुंके, संदीप रांगोळे, दत्तात्रय दगडे ,प्रशांत चव्हाण, सुनील खैरनार, मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष तथा गुणवंत कामगार आण्णा जोगदंड,व वेगळवेगवेगळ्या आस्थापनाचे कामगार व प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी पुणेचे सहा कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी प्रास्तविक केले. सुत्रसंचलन प्रदिप बोरसे यांनी केले. अविनाश राऊत  यांनी सर्वाचे आभार मानले.

error: Content is protected !!