वडगाव मावळ : अविष्कार एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय लोकराजा राजश्री शाहू महाराज पुरस्कार मावळ तालुक्यातील प्रसिद्ध व्याख्याते विवेक गुरव व सामाजिक कार्यकर्ते कमलेश राक्षे यांना प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात इस्रो संशोधन केंद्राचे सेवानिवृत्त अभियंता नगीन प्रजापती यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुर्हाडे, उपप्राचार्य प्रकाश चौधरी, रयत शिक्षण संस्था दक्षिण विभागाचे अध्यक्ष ए. बी. शेख, फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत गुरव व राक्षे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेते विवेक गुरव हे प्रसिद्ध व्याख्याते असून शासकीय, निमशासकीय संस्थांच्या माध्यमातून ते राज्यभर विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, तसेच लोकनियुक्त पदाधिकारी यांना व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. तसेचख ज्ञानविकास प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक, स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. कमलेश राक्षे हे महान राष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन