कंजारभाट समाजातील नागरिकांसाठी बुधवारी पिंपरीत शासन आपल्या दारी उपक्रम – मनोज माछरे
प्रतिनिधी श्रावणी कामत
पिंपरी, पुणे :महाराष्ट्र राज्यभर पसरलेल्या कंजारभाट समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळवण्यासाठी विविध समस्या उद्भवत आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य कंजारभाट समाज विकास कृती समितीच्या वतीने बुधवारी (दि. ३) पिंपरी येथे शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता, पिंपरी येथील भाट नगर, समाज मंदिरात सुरू होणाऱ्या उपक्रमात समाजातील बंधू, भगिनींचे जातीचे दाखल्यासाठी अर्ज भरून घेण्यात येणार आहेत अशी माहिती समितीचे कार्याध्यक्षमनोज माछरे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
महाराष्ट्रात मागील अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या कंजारभाट समाजातील युवक युवतींनाशिक्षणासाठी व इतर अनेक योजनांसाठी जातीचे दाखले मिळण्यास अनेक अडचणी येतात. यातील जाचक अट १९६१ सालचा वास्तव्याचा पुरावा ही मुख्य आहे. ही अट रद्द करण्याची अनेक वेळा समितीच्या वतीने शासकीय दरबारी मागणी केली. समितीचा वतीने जून २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार श्रीरंग बारणे यांच्या समवेत निवेदन देण्यात आले.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने बुधवारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात भोसरी, चिंचवड, पिंपरी, काळेवाडी येथील तलाठ्यांसह मंडल अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शासन दरबारी या उपक्रमाचा कंजारभाट समाज विकास कृती समितीचे संस्थापक व मार्गदर्शक मुरचंद भाट, कार्याध्यक्ष मनोज माछरे, अक्षय माछरे, मुंबईतील कार्यकर्ते सिद्धेश अभंगे, विनोद तमायचे, सुभाष माछरे, गणेश माछरे, , अभय भाट, राजेश नवले, दर्शनसिंग मलके यांनी यशस्वी पाठपुरावा केला आहे. या उपक्रमाचा शिक्षण व नोकरीसाठी विद्यार्थ्यांनी व युवकांनी जातीचे दाखले मिळवण्यासाठी लाभ घ्यावा असे आवाहन मनोज माछरे यांनी केले आहे.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित