जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत रेड स्वस्तिक सोसायटीची आरोग्य सेवा
पिंपरी:गेल्या बावीस वर्षांपासून रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून देहू येथून निघणाऱ्या जगद्गुरु तुकाराम यांच्या पालखीसोबत निरंतर आरोग्य सेवा देण्यात येत आहे. लोणी काळभोर येथून रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने दोन सुसज्ज ॲम्बुलन्सेस पाच डॉक्टर आणि इतर सेवाभावी मंडळी सोबत घेऊन संपूर्ण दर्जेदार औषधा सह दिंडीत जाणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्य सेवा सुरू केली.
या सेवेचे उद्घाघाटन लोणी काळभोर येथून रेड स्वस्तिकचे अ. भा. अध्यक्ष लिज्जत पापड ग्रुपचे महाव्यवस्थापक सुरेश कोते पुण्यातल्या प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. स्मिता वाबळे डॉ. मंगला सुपे डॉ. उमाकांत वाबळे रेड स्वस्तिक चे सहमहाव्यवस्थापक अशोक शिंदे जिल्हा सचिव सचिन भामरे कोषाध्यक्ष कमलेश राक्षे प्रकल्प संचालक नंदू रायगडे रेड स्वस्तिक ज्येष्ठ मार्गदर्शक जयसिंगराव पवार डॉक्टर संतोषराव सुपे डॉ. सांडभोर. माजी आरोग्य उपसंचालक डॉ. दत्ता पुणे आणि या प्रकल्पाचे प्रमुख संतोष राजगुरू डा.दत्ता खुणे यांच्या उपस्थित पार पडला .
यावेळी पायी चालणाऱ्या शेकडो वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ देऊन नारळ वाहून उद्घाटन करण्यात आले. यावेळी आशिष भोसले ,श्री दत्ता फुले श्री बाळासाहेब सूर्यवंशी श्री माऊली जाधव श्री राहुल जाधव श्री श्रीकांत माळी श्री भरत सूर्यवंशी या मंडळींच्या माध्यमातून सलग पंधरा दिवस म्हणजे रिंगणा पर्यंत ही सेवा दिली जाणार आहे. यासाठी औषधासह भाविकांच्या पायांची मालिश करण्यापर्यंत सर्व सेवा मोफत भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या भाविकांच्या सेवाभावी उपक्रमासाठी रेड स्वस्तिक चे संस्थापक महाव्यवस्थापक माजी अ.पोलीस महासंचालक श्री टि.एस भाल जिल्हाध्यक्ष मा श्री संतोष भाऊ बारणे अभा कार्याध्यक्ष श्री भगवान राऊत सहमहाव्यवस्थापक डॉक्टर श्री. प्रमोद नांदगावकर श्री. गोरे साहेब एड. श्री राजेश झाल्टे यांचे सह केमिस्ट असोसिएशनचे अखिल भारतीय अध्यक्ष मा.आ.श्री. जगन्नाथराव शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित