आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे: अनिल नाटेकर
खड्या आवाजाचे एक कवी लय दार आवाजात आपली कविता सादर करताना ऐकले. स्पष्ट शब्दोच्चार, श्रवणीय शब्दरचना आवडली. ते अनेक काव्य संमेलनातून नंतर दिसले. स्व. सुनील नाना पानसरे यांनी एक काव्य स्पर्धा आणि कविसंमेलनाचे आयोजन केले होते. मी एक परिक्षक होतो. त्यात ते स्पर्धक होते.
शब्दधन कार मा. डि बी शिंदे यांच्या परिचयाचे श्री. अमिरहमजा सर आळंदी येथील विद्यालयात होते. साहित्यिक आपल्या भेटीला हा उपक्रम त्यांनी आपल्या शाळेत घेतला. मी, डि बी शिंदे भोसरी स्टँड वर थांबलो. अमिरहमजा सर त्यांची कार घेऊन आले. शाळेत छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्याध्यापक श्री चव्हाण सर होते.
मी त्यांना आठवण करून दिली की, त्यांच्या हस्ताक्षरात लिहीलेली तुकाराम महाराज यांच्या मला भेट दिलेल्या तुकाराम गाथा ग्रंथ त्यांनी मला खोपोली भेटीत दिला होता. श्री. अनिल नाटेकर हे तिथे शिक्षक होते. त्यांची अगत्य पूर्ण, स्नेह पूर्ण वागणूक आवडली.
कवी, गीतकार, गझलकार, चित्रकार म्हणून महाराष्ट्रातील साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले अनिल नाटेकर एक, शालीन, सुसंस्कृत व्यक्तीमत्व आहे . त्यांचे पूर्ण नाव अनिल सुपडा नाटेकर असून ते बुलढाणा येथील येळगांव चे असून ते नोकरी निमित्त सध्या आळंदी देवाची , खेड (जि. पुणे ) येथे स्थायिक झाले आहेत.
ते बी.ए. सी.टी.सी., ए.टी. डी. असून सध्या मराठी विषयात एम ए करीत आहेत. अनेक विविध संस्थांचे प्रतिष्ठीत पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. उल्लेखनीय म्हणता येतील असे
एल्गार नवचेतना पुरस्कार ,शिवांजली साहित्य गौरव पुरस्कार, शांता शेळके प्रतिष्ठान पुरस्कार , माय मराठीचे शिलेदार पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य सेवा पुरस्कार, संत गाडगेबाबा काव्य गौरव पुरस्कार, गझलकार प्रकाशदादा बनसोडे पुरस्कार,काव्यात्मा साहित्य परिषद, पुणे गदिमा काव्यस्पर्धा पारितोषिक द्वितीय क्रमांक गझलसम्राट सुरेश भट युवा पुरस्कार,शब्दधन काव्य मंच, स्व.विजयराव कापरे स्मृती समरसता काव्य मैफिल करंडक स्पर्घा यामध्ये सर्वोत्कृष्ट काव्यलेखनाला, सादरीकरण यासाठी तृतीय क्रमांक प्राप्त झाले.
पुण्यातील नामवंत संस्था साहित्य सम्राट यांच्या वर्धापन दिनाचे जे ६६ वे साहित्य संमेलन झाले त्याचे ते कविसंमेलनाध्यक्ष होते. अखिल भारतीय साहित्य संमेलनात सुत्रसंचलन व काव्यवाचन त्यांनी केले.
साथ मराठी चॅनेलवर साहित्यिक आपल्या भेटीला कार्यक्रमात त्यांची विशेष मुलाखत प्रसारित झाली आहे.
“बाहेर पडतील कबुतरं “हे लोकगीत युट्युबला गायक चंदनजी कांबळे यांनी गायले आहे .तसेच, त्यांनी लिहीलेले कोराना गीत आळंदी चे प्रसिद्ध गायक श्री ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायले आहे जे प्रसिद्ध आहे.
त्यांच्या वारीचा अभंग गायक श्री ज्ञानेश्वर मेश्राम यांनी आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित केला आहे.
डाॅ.प्रा. धनंजय मिसे निर्मित”साखर” या’लघुपटाचे शीर्षक गीताचे लेखन त्यांनी केले आहे. साहित्यिक, संस्थापक श्री.शिवाजीराव चा़ळके शिवांजली साहित्यपीठ चाळकवाडी यांच्या सहकार्याने १९९७ ला गावी पहिली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी केली.
त्यांनी खेडोपाठी जयंती निमित्त मार्गदर्शन, सुत्रसंचलन, विविध स्पर्धा आयोजित केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंचमांजरी, हडपसर, पुणे या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. सांप्रत ते शाळा व्यवस्थापन समिती, आळंदी नगरपरिषद शिक्षण विभाग शाळा क्रं.४ चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
( शब्दांकन:बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर)
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्याच्या प्रा.अर्चना येवले यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
- आता सोडणार नाही रे मौका..रवि आप्पाचा वादा पक्का.. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी गाण्यातून रविंद्र भेगडेंचा धमाका
- कुलस्वामिनी श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
- दत्तात्रेय वाघमारेे यांचेे निधन
- दक्षिण कोरिया ची हुदांई स्टील तळेगाव दाभाडेत: आर एम के इंडस्ट्रियल पार्क मध्ये कार्यान्वित होणार