कार्ला:मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-यासह अवकाळी पावसाचे आगमन होत असून या पावसामुळे अनेकांना याचा फटका बसत असून दुपारी झालेल्या वादळामुळे शिलाटणे गावातील अनेकजणांच्या घराचे पत्रे उडून गेले.

   कार्ला गावातील अनेक झाडांच्या फांद्या तुटल्याने एम एस सी बी आॕफिस समोर लावलेल्या अक्षय पवार  यांंच्या चारचाकी वाहनावर फांदी पडल्याने नुकसान झाले आहे.

शिलाटणे गावाखालील पडाळीवर बाबाजी धोंडिबा भानुसघरे,निवृती कोंडिराम भानुसघरे,शांताराम कोंडिराम  भानुसघरे या ग्रामस्थांच्या घरांचे व दुकनाचे पत्रे फुटले व उडून गेल्याने खुप मोठे नुकसान झाले.

वादळामुळे गावातील अनेक झाडांच्या फांद्या तुटल्याने  अनेकांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे विजवाहक तारा तुटल्या  व खांबाचे देखील नुकसान झाले या मुळे काही काळ  काही भागात  विजपूरवठा देखील खंडित झाला होता.परंतु तत्परतेने महावितरण कर्मचा-यांनी तो विजपूरवठा देखील  सुरळीत केला.

या अचानक आलेल्या वादळामुळे व पावसाने ज्यांचे नुकसान झाले आहे त्याचा पंचनामा करुन  नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त ग्रामस्थ करत आहे.

You missed

error: Content is protected !!