वडगाव मावळ येथे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे राज्यस्तरीय पुरस्काराचे दिमागदार आयोजन

वडगाव मावळ : महाराष्ट्रातील कर्तबगार व्यक्तींचा सन्मान करून त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य जगा समोर मांडून त्यांची प्रेरणा इतरांनी ही घ्यावी व महाराष्ट्र राज्या मध्ये समृध्द आणि भरभराटी प्रस्थपित व्हावी ही महत्वकांशा घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भर महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे क्रांतिकारी उपक्रम रभिवला जात आहे.

त्याचाच भाग म्हणून पुण्यातील मावळ येथील भेगडे लॉन्स येथे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते, ज्या मध्ये मावळ भागातील कला, क्रीडा, औद्योगिक, शैक्षणिक, अध्यात्मिक,राजकीय, सामाजिक, या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंत मावळकरांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे “प्राइड ऑफ महाराष्ट्र” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमासाचे उद्घाटन मराठी अभिनेता अंकुश मांडेकर, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् चे अध्यक्ष आदम सय्यद, वास्तू व  ज्योतिष शास्त्र तज्ञ, अखिलेश राजगुरू यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् तर्फे प्राइड ऑफ महाराष्ट्र या राज्यस्तरीय पुरस्कारांने  सुनील ढोरे, (यशस्वी उद्योजक),पद्मावती ढोरे (सहकार क्षेत्र, ऐश्वर्या लक्ष्मी पतसंस्था मावळ ),  गणेश भेगडे (यशस्वी उद्योजक ), गणेश बोऱ्हाडे (आदर्श सरपंच साते ),प्रकाश पिंगळे ( यशस्वी उद्योजक पिंगळे राईस मिल ), ज्योती भरत राजीवडे ( सामाजिक कार्यकर्ते )

सन्मानित करण्यात आले.

तसेच मावळ परिसरात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेश विनोद, रामदास वाडेकर, ओव्हाळ अदि पत्रकारांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला 

 महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स ही एक अशी संस्था आहे ज्याचा उद्देश आपल्या राज्याच्या विविध क्षेत्रात समृद्धी, भरभराटी, तसेच अभिमानास्पद  व उल्लेखनीय  कामगिरी करणाऱ्या असामान्य व्यक्तींचा गौरव, कौतुक आणि सन्मान करणे हा आहे, जेणे करून अश्या व्यक्तिंना उर्जा मिळावी व आणखी जोमाने उत्कृष्ट कार्य करण्यास बळ प्राप्त व्हावे अशी महिती संस्थेचे अध्यक्ष आदम सय्यद यांनी दिली.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे पदाधिकारी व टाइम्स ऑफ पुणे चे मावळ प्रतिनिधी अनिल घारे, संस्थेचे सचिव स्नेहा कुलकर्णी, उपाध्यक्ष सतीश राठोड, लकी साळुंके यांनी केले होते.

You missed

error: Content is protected !!