पत्रकारांवर  झालेल्या शिवीगाळे बद्दल पत्रकार संघटनांच्या वतीने जाहीर निषेध व पोलीस स्टेशनला निवेदन 

वडगाव मावळ : 

कामशेत येथील अतिक्रमणाची बातमी लावल्यामुळे पत्रकारांना दमदाटी व  शिवीगाळ करण्याची घटना घडली होती. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ केल्यामुळे मावळ तालुक्यातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. 

या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन पत्रकार संघटनाच्या वतिने कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.  आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी वडगाव मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा, ज्येष्ठ पत्रकार सुदेश गिरमे, मा.अध्यक्ष गणेश विनोदे उपाध्यक्ष सचिन ठाकर, पत्रकार परिषद प्रमुख निलेश ठाकर, सुभाष भोते, शिवानंद कांबळे उत्तम ठाकर, अभिषेक बोडके, चेतन वाघमारे, केदार शिरसाट महेश भागिवंत, सोपान येवले उपस्थित होते.

You missed

error: Content is protected !!