तळेगाव दाभाडे :

 जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी एकावर पिस्तूलातून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (दि.23) रात्री 11:30 वा. भेगडे आळी तळेगाव दाभाडे in “ता. मावळ जि.पुणे हद्दीत घडली.

 सुदैवाने गोळी खांद्याला चाटून केल्याने जीव वाचला. या घटनेने तळेगाव दाभाडे शहरात खळबळ उडाली. जखमी आदित्य भेगडे याने तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

आदित्य गणेश भेगडे (वय 27, रा. भेगडे आळी तळेगाव दाभाडे ता. मावळ) गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

धुर्व खिलारी व इतर दोघेजण गोळीबाराच्या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी आदित्य गणेश भेगडे याच्यावर पूर्वी 3 गुन्हे दाखल असून जुन्या भांडणाच्या वादातून आरोपी ध्रुर्व खिलारी व त्याचे दोन साथीदारांनी आदित्य भेगडे याच्यावर गोळीबार केला. गोळी डाव्याला खांद्याला चाटून गेल्याने जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप रायनावर, अधिकारी व पोलीस अंमलदारांनी धाव घेतली. आरोपी गुन्हा करुन घटनास्थळावरुन फरार झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप रायनावर करत आहेत.परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तसेच आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना केले आहे. लवकरच आरोपींना अटक करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

You missed

error: Content is protected !!