तळेगाव दाभाडे: 

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. सूरज राजेंद्र रायकर (२८, रा. माळी नगर, तळेगाव) असे नवरदेवाचे.नाव आहे.त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलीसांनी दिली. 

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,” सुरज रायकर याचा आज मंगळवार ता.१६ला लग्नसोहळा पार पडणार होता. घरात सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू होती. 

मात्र, सकाळी त्याने मामाला फोन केला. “मला लग्न करायचे नाही”, असे सांगून तो घराबाहेर पडला.घरातल्या मंडळींनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, सुरज मिळून आला नाही. काही वेळानंतर घरापासून काही अंतरावर वाण्याचा मळा येथील विहिरीजवळ सुरज याची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी काही स्वयंसेवकांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला. त्यावेळी सुरज याचा.मृतदेह मिळून आला. या घटनेमुळे तळेगाव परिसरात एकच.खळबळ उडाली आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहे.

error: Content is protected !!