नूतम महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

तळेगाव स्टेशन:                          

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमचे प्राचार्य डॉ विलास देवतारे यांचा हस्ते पूजन करण्यात आले.                     

१४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉ.  बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्ची केले. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते.

 त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले.        

याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!