तळेगाव स्टेशन:
येथे अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) “स्वामी जयंती उत्सव” पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि.१० ला हा सोहळा संपन्न होणार आहे.सारिका गणेश काकडे (अध्यक्ष, सिध्दीविनायक प्रतिष्ठान, तळेगाव स्टेशन) कार्यक्रमाच्या आयोजक आहे.
बुधवारी स्वामी समर्थ मंत्राचे हवन दु.३:०० वाजता होईल. श्री स्वामी समर्थ चरित्र ग्रंथाचे वाचन व हवन- दु. ३.४५ ते ५.०० वा.
पालखी सोहळा-सायं. ५:०० वा. ते ८:३० वा या वेळेत असेल.
मिरवणुक मार्ग-सप्तश्रृंगी मंदिर इंद्रायणी कॉलनी, आनंदनगर, मनोहर नगर, वनश्रीनगर, स्वामी समर्थ मंदिर, सिम्को कॉलनी, मोहननगर, परत सप्तश्रृंगी मंदिर असा आहे.आरती व महाप्रसाद- रात्री ८.३० वाजता आहे.या
सोहळ्यात सर्व स्वामी भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन काकडे यांनी केले. स्वामी समर्थ मंदिर येथे दर गुरुवारी आणि रविवारी सायं. ६ वा. आरती होईल.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित