सह्याद्री विद्यार्थी अकादमी व WFV संस्थेमार्फत पशुपक्ष्यांसाठी पाण्याच्या भांडेचे वाटप 

कामशेत( सुरेश शिंदे ) :

सध्या कडक उन्हाळा पडत आहे त्यामुळे नागरिकांना जशी पाण्याची गरज भासते तशीच पशुपक्षांना देखील भासत आहे,अनेक वन्य प्राणी देखील पाण्याच्या शोधार्थ नागरी वस्तीमध्ये येताना आढळत आहे.

 हीच गरज ओळखून सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ  व WFV संस्था यांच्या सयूंक्त विद्यमानाने  मुक्या पशु पक्षी यांना तहान भागवण्यासाठी दारात ठेवता येतील अशी सिमेंट ची भांडी वाटप करण्यात आली आहे.

प्रायोगिक तत्वावर प्रथम 30 जणांना ही भांडी दिली गेली असून पुढे ज्यांना ज्यांना अशी भांडी हवी असेल त्यांची नावनोंदणी करून घेण्यात आली आहे, ही सर्व भांडी मोफत दिली गेली असून मुक्या प्राण्यांना देखील आपल्या आधाराची गरज असते अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे .

 उन्हाळ्या मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने या उपक्रमामुळे प्राण्यांना व पक्षांना थोडी तरी मदत होईल या उद्देशाने तरी या उपक्रमात सर्वानी सहभाग दाखवा असे आवाहन करण्यात आले आहे. 

या वेळी अनेक पशु पक्षी प्रेमी उपस्थित होते.

error: Content is protected !!