तळेगाव स्टेशन:
हुस्को हायड्रॉलिक प्रायव्हेटेड लिमिटेड कंपनी मार्फत नवलाख उंब्रे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.हुस्को कंपनी मार्फत दरवर्षी जिल्हा परिषद शाळांमधील तसेच ग्रामीण भागातील हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते.
या कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांचा भर हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य पुरविण्यावर असतो. तसेच साहित्य ही दर्जेदार स्वरूपाचे असते. यावर्षीही हुस्कोमार्फत नवलाख उंब्रे शाळेतील मुलांना लागणारे सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य तसेच पहिलीच्या विद्यार्थ्यांना दप्तर आणि बॉटल चे वाटप यावेळी करण्यात आले.
ग्रामीण भागातील मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची असल्याने त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि त्यांना शिकताना कसल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांना मिळाव्यात हा प्रामाणिक प्रयत्न ही कंपनी करत आहे.
यावेळी कंपनीचे अधिकारी श्री.दीपक शर्मा, प्रशांत जोशी, दत्तराज डेरे, प्रदीप गुथे, इम्तियाज शेख, अतुल निकम, शीतल धोंगडे, रोहित नाईक, संतोष लामगुंडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.विशाल शेटे, सदस्य युवराज शेवकरी, संग्राम कदम, सीमा शेटे, सोमवंशी ताई, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन