तळेगाव दाभाडे:
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांची सदिच्छा भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके,ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष संदीप आंद्रे, पवन मावळो अध्यक्ष भरत भोते, आंदर मावळ अध्यक्ष रूपेश घोजगे, खरेदी विकी संघाचे सभापती शिवाजी असवले,प्रदेश चिटणीस विक्रम कदम;प्रवक्ते राज खांडभोर, उपाध्यक्ष प्रशांतभागवत,,सरचिटणीस सुहास गरूड,केशव कुल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे स्वागत केले.लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने बारणे व खांडगे यांच्यात चर्चा झाली. मावळ लोकसभा मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी होऊ असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.