
वडगाव मावळ :
जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्नेहल प्रशांत ओव्हाळ यांची बिनविरोध झाली.मावळत्या उपसरपंच कल्पना काकरे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.
उपसरपंच पदाच्या निवडणूकीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात
सरपंच नागेश ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली.यावेळी उपसरपंच पदासाठी स्नेहल ओव्हाळ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिका-यांनी ओव्हाळ यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
ग्रामसेविका कल्याणी लोखंडे यांनी निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले.
या प्रसंगी माजी आदर्श सरपंच संतोष जांभुळकर, माजी उपसरपंच एकनाथ गाडे, कुंदा खांदवे, ग्रामपंचायतीच्या सदस्या तृप्ती जांभूळकर, रुपाली गायकवाड, रखाबाई भोईर, अमित ओव्हाळ उपस्थित होते. सरपंच नागेश ओव्हाळ, अंकुश काकरे, तानाजी खांदवे, मानाजी खांदवे, चंद्रकांत ओव्हाळ, भास्कर ओव्हाळ, बाळासाहेब काकरे, बाळकृष्ण काकरे, अमोल पोटवडे, अमोल ओव्हाळ, प्रमोद पोटवडे, अनिल काकरे, महेंद्र ओव्हाळ, माणिक काकरे,भानुदास जांभूळकर,अमोल काकरे,यांच्यासह सर्व सदस्यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच स्नेहल ओव्हाळ यांचा सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित उपसरपंच स्नेहल ओव्हाळ म्हणाल्या,” जांभूळ ग्रामपंचायत हद्दीत अंतर्गत रस्ते, पथदिवे, सांडपाण्याची गटारे, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार तसेच ग्रामपंचायत ला केंद्र व राज्य पुरस्कार प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.उपसरपंच पदी बिनविरोध निवड केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानते.महिला बचत गटांना प्राधान्य देणार आहे.
- धर्मासाठी मृत्यूला कवटाळून संभाजीमहाराज अमर झाले: डॉ. केदार फाळके
- जगताना विवेक खूप महत्त्वाचा असतो!’ – प्रा. डाॅ. वर्षा तोडमल
- बीना इंग्लिश स्कूलच्या वतीने काश्मीरमधील मृतांना श्रद्धांजली
- नफ्यातून समाजोपयोगी उपक्रम घेणाऱ्या काळोखे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : सर्जेराव कांदळकर
- गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुकन्या रितेश चोरघे बिनविरोधडीजे,डॉल्बी आणि ढोलताशांच्या दणदणाटाला फाटा : किर्तन सोहळ्याचे आयोजन




